ह्रदयाचे ठोके वाढवणाऱ्या सामन्यात अखेर अर्जेंटिना विजयी; 2 गोल करुनही केप व्हर्डेचा निसटता पराभव
गतविजेत्या अर्जेंटिनानं 32 संघांच्या फेरीत केप व्हर्डेविरुद्धचा अनपेक्षित पराभव थोडक्यात टाळला. अर्जेंटिनानं केप व्हर्डेला 3-2 नं हरवून 16 संघांच्या फेरीत प्रवेश केला

Published : July 4, 2026 at 9:21 AM IST
Argentina vs Cabo Verde : गतविजेत्या अर्जेंटिनानं 32 संघांच्या फेरीत केप व्हर्डेविरुद्धचा अनपेक्षित पराभव थोडक्यात टाळला. मियामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एका रोमांचक सामन्यात, अर्जेंटिनानं केप व्हर्डेला 3-2 नं हरवून 16 संघांच्या फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना झाला, पण अतिरिक्त वेळेत केप व्हर्डेनं स्वतःच्याच पायावर धोंडा मारुन घेतला. केप व्हर्डेनं संपूर्ण सामन्यात दमदार खेळ केला, पण अखेरीस एक संधी गमावली. आता अर्जेंटिनाचा सामना पुढील फेरीत इजिप्तशी होईल.
Argentina's extra time winner sends them to the Round of 16! 👏#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 4, 2026
केप व्हर्डेच्या कामगिरीनं सर्वांना केलं आश्चर्यचकित : विशेष म्हणजे, केप व्हर्डेनं अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाला संपूर्ण सामन्यात रोखून धरलं होतं. सामन्याचा निकाल लावण्यासाठी 15-15 मिनिटांचे दोनदा अतिरिक्त वेळ लागला. या सामन्यात अर्जेंटिनाकडून मेस्सी हा सर्वोत्तम खेळाडू होता, पण केप व्हर्डेनंच खरी बाजी मारली. आपला पहिला विश्वचषक खेळणाऱ्या केप व्हर्डेचा प्रवास 32 संघांच्या फेरीतच संपला असला तरी, ज्या प्रकारे त्यांनी अर्जेंटिनावर दबाव टाकला ते कौतुकास पात्र आहे. जर बोर्जेसनं स्वतःच्याच पायावर धोंडा मारला नसता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. अंतिम शिट्टी वाजताच सामना अर्जेंटिनाच्या बाजूनं झुकला, तेव्हा केप व्हर्डेचे खेळाडू आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते.
We're going to extra time at Miami Stadium! ⏳#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 4, 2026
मेस्सीनं मिळवून दिली आघाडी : लिओनेल मेस्सीनं पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. मेस्सीनं 29व्या मिनिटाला गोल करुन अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला, 59 व्या मिनिटाला डेरॉय डुआर्टेनं केप व्हर्डेसाठी गोल करुन स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. खेळाच्या संपूर्ण 90 मिनिटांपर्यंत स्कोअर बरोबरीतच राहिला. त्यानंतर लिसँड्रो मार्टिनेझनं अतिरिक्त वेळेत दुसरा गोल करुन अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. मार्टिनेझनं 92 व्या मिनिटाला गोल केला.
🇦🇷 Argentina have qualified for the Round of 16!#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 4, 2026
कॅब्रेलनं केप व्हर्डेला वाचवलं : मार्टिनेझच्या गोलनंतर, अर्जेंटिना हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं, परंतु सिडनी लोपेस कॅब्रेलनं 103व्या मिनिटाला गोल करुन अर्जेंटिनाला आश्चर्यचकित केले. कॅब्रेलच्या गोलमुळं स्कोअर 2-2 असा बरोबरीत आला. यामुळं आणखी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ खेळावा लागला. अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. 111 व्या मिनिटाला मेस्सीनं कॉर्नरमधून गोल करण्याचा प्रयत्न केला, पण केप व्हर्डेच्या डाइन बोर्जेसनं आत्मघाती गोल करून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. बोर्जेसच्या आत्मघाती गोलमुळं अर्जेंटिनाला पुन्हा एकदा आघाडी मिळाली. त्यानंतर केप व्हर्डेनं 116 व्या आणि 120 व्या मिनिटाला आणखी प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. तरीही, केप व्हर्डेचे खेळाडू अर्जेंटिनावर दबाव टाकण्यात यशस्वी झाले.
हेही वाचा :
- गोल नव्हे कला! कोल्हापूरच्या फ्रिस्टाईल फुटबॉलरनं केले एकापाठोपाठ चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; पाचव्याचीही तयारी सुरु
- गतविजेत्या अर्जेंटिनासमोर केप व्हर्डेचं आव्हान; कोलंबिया-घाना, ऑस्ट्रेलिया-इजिप्तही विजयासाठी भिडणार
- नवख्या देशाच्या क्रिकेटपटूनं रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडला; 60 सामन्यातच केला महापराक्रम

