आजपासून सुरु होणार नवी T-20 लीग, दिग्गज भारतीय खेळाडू दिसणार मैदानात; कुठं पाहता येणार लाईव्ह सामने?
युरोपमधील फ्रँचायझी क्रिकेटला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशानं, युरोपियन टी-20 प्रीमियर लीग (ETPL) 2026 च्या पहिल्या हंगामाला बुधवार, 26 ऑगस्ट रोजी सुरुवात होईल.

Published : August 26, 2026 at 11:14 AM IST
मुंबई ETPL 2026 : एक नवीन टी-20 लीग आपल्या पहिल्या हंगामासह क्रिकेट विश्वात दाखल होणार आहे. युरोपमधील फ्रँचायझी क्रिकेटला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशानं, युरोपियन टी-20 प्रीमियर लीग (ETPL) 2026 च्या पहिल्या हंगामाला बुधवार, 26 ऑगस्ट रोजी सुरुवात होईल. या स्पर्धेत सहा संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील आणि अंतिम सामना 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही लीग क्रिकेट आयर्लंड, क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन यांचा संयुक्त उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मान्यता दिलेल्या या स्पर्धेत अनेक विद्यमान आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होतील.
6️⃣ Captains. 1️⃣ Trophy. History starts tomorrow! 🏆🔥
— European T20 Premier League (ETPL) (@etplofficial) August 25, 2026
The captains have arrived, the prize is unveiled, and the stage is set for the inaugural #ETPL 🏏🏟️ pic.twitter.com/RKm1ZW9Q15
32 सामन्यांनंतर ठरणार विजेतेपद : ETPL चा पहिला हंगाम 26 दिवस चालेल आणि त्यात एकूण 32 सामने खेळले जातील. सहा संघ डबल राऊंड-रॉबिन लीग टप्प्यात स्पर्धा करतील, ज्यात प्रत्येक संघ 10 सामने खेळेल. लीग टप्प्यातील अव्वल संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये 19 सप्टेंबर रोजी एक पात्रता सामना खेळला जाईल. या सामन्याचा विजेता अंतिम सामन्यात अव्वल संघाशी सामना करेल. विजेतेपदाचा सामना 20 सप्टेंबर रोजी होईल.
The historic day is here 🤩
— European T20 Premier League (ETPL) (@etplofficial) August 26, 2026
The #ETPL kicks-off today with an absolute banger 💥🔥#RDvAF pic.twitter.com/F8PSAvfkfF
दोन देशांमध्ये आयोजित होणार स्पर्धा : या स्पर्धेचं आयोजन दोन देशांमध्ये होणार आहे. स्पर्धेतील पहिले 17 सामने नेदरलँड्समधील वूरबर्ग येथील स्पोर्टपार्क डुइवेस्टाइन इथं खेळले जातील. त्यानंतर लीग आयर्लंडमधील डब्लिन येथील मालाहाइड क्रिकेट क्लबमध्ये जाईल, जिथं 18 ते 32 क्रमांकाचे सामने खेळले जातील. प्लेऑफ आणि अंतिम सामना देखील तिथंच आयोजित केला जाईल.
संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश : ईटीपीएलमध्ये आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समधील शहरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा फ्रँचायझींचा समावेश आहे. यामध्ये ॲमस्टरडॅम फ्लेम्स, रॉटरडॅम डॉकर्स, डब्लिन गार्डियन्स, बेलफास्ट वुल्व्स, ग्लासगो कॉस्मिक्स आणि एडिनबर्ग कॅसल रॉकर्स यांचा समावेश आहे. ॲमस्टरडॅम फ्लेम्स संघात स्टीव्ह स्मिथ, टिम डेव्हिड, स्कॉट एडवर्ड्स आणि भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांसारखे खेळाडू आहेत. रॉटरडॅम डॉकर्स संघातही फॅफ डु प्लेसिस, हेनरिक क्लासेन, ॲनरिच नॉर्खिया आणि जय मुंद्रा यांसारखे खेळाडू आहेत.
No look 😎
— European T20 Premier League (ETPL) (@etplofficial) August 25, 2026
Can you guess who this big-hitter is? 🤔
Clue: Watch this Italian in action in the #ETPL, starting tomorrow 😉 pic.twitter.com/vCbz8zKvjw
डब्लिन गार्डियन्स संघाचं नेतृत्व भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन करेल. बेलफास्ट वुल्व्स संघात स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांचा समावेश आहे. एडिनबर्ग कॅसल रॉकर्स संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये मिचेल सँटनर आणि ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे, तर ग्लासगो कॉस्मिक्स संघाचं नेतृत्व जॉर्ज मुन्सी करेल आणि संघात दक्षिण आफ्रिकेचे लुंगी एनगिडी व केशव महाराज यांचाही समावेश आहे.
भारतात ईटीपीएल 2026 कुठं पाहावं? : भारतात, युरोपियन टी-20 प्रीमियर लीग 2026 चे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) जिओहॉटस्टारवर उपलब्ध असेल. ही लीग जगभरात थेट प्रक्षेपित केली जाईल.
हेही वाचा :

