ETV Bharat / sports

9 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या सामन्यासाठी इंग्रजांनी केली संघाची घोषणा; पोलिसांनी ताब्यात घेतलेला खेळाडू संघाबाहेर

इंग्लंड क्रिकेट संघानं बर्मिंगहॅममधील एडजबॅस्टन इथं होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

ENG vs PAK 3rd Test
इंग्लंड क्रिकेट संघ (संग्रहित छायाचित्र) (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : September 3, 2026 at 10:55 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बर्मिंगहॅम ENG vs PAK 3rd Test : पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतल्यानंतर, इंग्लंड आता क्लीन स्वीप करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. इंग्लंड क्रिकेट संघानं बर्मिंगहॅममधील एडजबॅस्टन इथं होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात एका वादग्रस्त घटनेनंतर संघातून वगळण्यात आलेल्या वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सला पुन्हा एकदा वगळण्यात आलं आहे.

सोनी बेकरला संघात स्थान : इंग्लंडनं युवा वेगवान गोलंदाज सोनी बेकरला कायम ठेवलं आहे. दरम्यान, अंतिम कसोटीसाठी निवडलेल्या संघातून वेगवान गोलंदाज मॅथ्यू फिशरला वगळण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, संघात इतर कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. डर्बीमधील एका नाईटक्लबबाहेर झालेल्या घटनेनंतर ब्रायडन कार्स गेल्या महिन्यात चर्चेत आला होता. 22 ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेनंतर, पोलिसांनी त्याला काही काळासाठी हातकड्या घालून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आलं. 31 वर्षीय कार्सची चौकशी अजूनही सुरु असल्यानं, त्याचं संघात पुनरागमन होऊ शकलेलं नाही.

इंग्लंडची नजर क्लीन स्वीपवर : लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना जिंकून इंग्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, संघ पाकिस्तानला 3-0 नं व्हाईटवॉश देण्याच्या प्रयत्नात असेल. तिसरा आणि अंतिम कसोटी सामना 9 सप्टेंबरपासून बर्मिंगहॅममधील एडजबॅस्टन इथं खेळला जाईल. जो रुटला इंग्लंड संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. वेगवान गोलंदाजी विभागात जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, सोनी बेकर, सॅम कुक, ऑली रॉबिन्सन आणि जोश टंग यांसारखे पर्याय आहेत. संघात हॅरी ब्रूक, बेन डकेट, ऑली पोप आणि जॉर्डन कॉक्स यांसारख्या फलंदाजांचाही समावेश आहे. हा सामना पाकिस्तानसाठी आपली प्रतिष्ठा वाचवण्याची शेवटची संधी असेल, तर इंग्लंड हा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असेल.

पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ : जो रुट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, सोनी बेकर, शोएब बशीर, हॅरी ब्रुक, सॅम कुक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, एमिलियो गे, डॅन लॉरेन्स, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जेमी स्मिथ आणि जोश टंग.

हेही वाचा :

  1. सेमीफायनलचं तिकिट मिळवण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात; पहिल्यांदाच होणारा सामना 'इथं' दिसेल लाईव्ह
  2. पहिल्यांदाच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं भारतात आयोजन; फक्त दोन शहरात होणार सामने
  3. W,W,W,W,W,W,W... 5 धावांच्या बदल्यात घेतल्या 7 विकेट; कर्णधारानं केली आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी