ETV Bharat / sports

ENG vs NZ सामना पावसात वाहून गेला तर पाकिस्तान न खेळताच बाहेर; समीकरण काय?

न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ त्यांच्या शेवटचा सुपर-8 फेरीतील सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल.

ENG vs NZ Match
ENG vs NZ सामना पावसात वाहून गेला तर पाकिस्तान न खेळताच बाहेर (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 27, 2026 at 1:12 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोलंबो ENG vs NZ Match : न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ त्यांच्या शेवटचा सुपर-8 फेरीतील सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. न्यूझीलंडसाठी हा 'करो या मरो'चा सामना आहे. त्यामुळं जर सामना झाला तर त्यांना सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी सामना जिंकावंच लागेल. मात्र, पाकिस्तान या सामन्यासाठी हवामान अंदाजावर बारकाईनं लक्ष ठेवून असेल. जर कोलंबोमध्ये पावसानं सामना खराब केला तर पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

27 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये हवामान कसं असेल? : 27 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता खूपच कमी आहे. हवामान अंदाजानुसार, संध्याकाळी तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. आर्द्रता 75 टक्के राहू शकते. ताशी 7 किलोमीटर वेगानं वाऱ्याचा वेग अपेक्षित आहे. जर पावसामुळं सामना रद्द झाला तर इंग्लंड आणि न्यूझीलंड दोघांनाही प्रत्येकी 1 गुण मिळेल, ज्यामुळं त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल. पाकिस्तान न खेळताच स्पर्धेतून बाहेर पडेल. जर सामना आता खेळला गेला तर पाकिस्तान न्यूझीलंडच्या पराभवासाठी प्रार्थना करत असेल. जर इंग्लंड सामना जिंकला तर पाकिस्तानच्या आशा जिवंत राहतील. न्यूझीलंडचा विजय हा पाकिस्तानसाठी स्पर्धेचा शेवट असेल.

पाकिस्तानचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध : सुपर-8 फेरीत पाकिस्तानचा शेवटचा टी-20 सामना शनिवारी खेळला जाईल. पाकिस्तानी संघ या दिवशी श्रीलंकेशी सामना करेल. हा सामना पल्लेकेले इथं खेळला जाईल. जर न्यूझीलंडनं त्यापूर्वी विजय मिळवला तर हा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना निरर्थक ठरेल. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्यात काय होतं ते पाहणं बाकी आहे. उर्वरित सामने देखील खूप महत्वाचे आहेत आणि ते खूप मनोरंजक असण्याची अपेक्षा आहे.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

इंग्लंड : फिलिप सॉल्ट, जॉस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (कर्णधार), टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओवरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, बेन डकेट, ल्यूक वुड, जोश टंग, रीहान अहमद.

न्यूजीलंड : टिम सायफर्ट (विकेटकीपर), फिन एलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, मार्क चॅपमॅन, मिशेल सेंटनर (कर्णधार), कोल मॅककॉन्ची, मॅट हेनरी, ईश सोढी, लॉकी फर्ग्यूसन, जेम्स नीशम, जेकब डफी, काइल जेमीसन, डेवोन कॉन्वे.

हेही वाचा :

  1. 2 जागा 4 संघ... भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यझीलंड; कोणते दोन संघ जाणार पुढे?
  2. IND vs WI सामना पावसात रद्द झाला तर सेमीफायनलमध्ये कोण जाणार?
  3. आजच्या ENG vs NZ सामन्यात ठरणार पाकिस्तानचं भवितव्य; सामना तिन संघासाठी महत्त्वाचा