पाकिस्तानी खेळाडूंची द हंड्रेडमधून हकालपट्टी होणार? ईसीबीनं केलं मोठं विधान
द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागांबद्दलच्या चर्चांमध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) अखेर आपलं मौन सोडलं आहे.

Published : February 25, 2026 at 3:16 PM IST
लंडन The Hundred League : द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागांबद्दलच्या चर्चांमध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) अखेर आपलं मौन सोडलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळं खेळाडूंना दुर्लक्षित करण्यात आल्याच्या वृत्तांबाबत आता अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
In a joint statement, the ECB and all eight of The Hundred team franchises have reaffirmed their commitment to ensuring The Hundred continues to be a competition that is inclusive, welcoming and open to allhttps://t.co/VxG5HPaxS5
— England and Wales Cricket Board (@ECB_cricket) February 24, 2026
ECB नं जारी केलं मोठं विधान : द हंड्रेडसाठी निवडीदरम्यान पाकिस्तानी खेळाडूंसोबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही असं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यात, बीबीसीच्या एका अहवालात दावा करण्यात आला होता की आठ संघांच्या स्पर्धेतील चार फ्रँचायझी मँचेस्टर सुपर जायंट्स, एमआय लंडन, सदर्न ब्रेव्हज आणि सनरायझर्स लीड्स पुढील महिन्याच्या लिलावासाठी पाकिस्तानी खेळाडूंचा विचार करणार नाहीत.
67 पाकिस्तानी खेळाडूंनी केली नोंदणी : या वर्षी, एकूण 67 पाकिस्तानी खेळाडूंनी (63 पुरुष आणि 4 महिला) त्यांच्या बोली सादर केल्या आहेत. या अहवालामुळं क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. यावर ECB ने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की द हंड्रेड ही एक समावेशक आणि खुली स्पर्धा आहे आणि निवड केवळ कामगिरी, उपलब्धता आणि संघाच्या गरजांवर आधारित असेल.
MI London is committed to ensuring The Hundred is a competition that it is inclusive, welcoming and open to all.
— MI London (@MILondonCricket) February 24, 2026
Players must not be excluded on the grounds of their nationality.
Alongside the other seven teams, we commit to selection being based solely on cricketing… pic.twitter.com/oOZgJJX3cA
2009 पासून पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये बंदी : 2009 पासून पाकिस्तानी खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळलेले नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक तणावामुळं ही परिस्थिती कायम आहे. आता अनेक आयपीएल मालकांनी वेगवेगळ्या देशांमधील लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत, त्यामुळं इतर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना मिळणाऱ्या संधी मर्यादित होण्याची भीती होती.
पुढील महिन्यात होणार लिलाव : द हंड्रेडचा लिलाव 11 आणि 12 मार्च रोजी लंडनमध्ये होणार आहे, जिथं खेळाडूंचे भवितव्य ठरवलं जाईल. या वादाच्या पार्श्वभूमीवर, इंग्लंडचं माजी कर्णधार मायकेल वॉन यांनीही ईसीबीकडून कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले की जर क्रिकेट हा इंग्लंडचा सर्वात समावेशक खेळ असेल तर अशा भेदभावाला जागा नसावी. सर्वांचं लक्ष आता लंडनच्या लिलावावर आहे. द हंड्रेडमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना समान संधी मिळतील की वाद पुन्हा वाढेल हे लवकरच उघड होईल.
हेही वाचा :

