161/0 ते 266/10... वैभव बाद होताच ईस्ट झोनचा डाव गडगडला; दोन्ही संघ एकाच धावसंख्येवर सर्वबाद
सेंट्रल झोन आणि ईस्ट झोन यांच्यातील दुलीप ट्रॉफी सामना क्रिकेटच्या अटीतटीच्या सामन्याचं एक उत्तम उदाहरण ठरला आहे.

Published : August 31, 2026 at 5:16 PM IST
बेंगळुरु Duleep Trophy : सेंट्रल झोन आणि ईस्ट झोन यांच्यातील दुलीप ट्रॉफी सामना क्रिकेटच्या अटीतटीच्या सामन्याचं एक उत्तम उदाहरण ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल झोनचा संघ 266 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, ईस्ट झोनची सुरुवात अशी होती की सामना त्यांच्या बाजूनं झुकत असल्याचं वाटत होता. एकवेळ सामन्यात एकही गडी न गमावता 161 धावा करणाऱ्या ईस्ट झोनचा संघ पुढील 105 धावांत सर्व 10 गडी गमावून अचानक कोसळला आणि संपूर्ण संघ 266 धावांवर येऊन थांबला. दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं पहिल्या डावात दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच राहिली.
वैभवची दमदार सुरुवात : सेंट्रल झोन आणि ईस्ट झोन यांच्यातील दुलीप ट्रॉफी सामना क्रिकेटच्या रोमांचक खेळाचं एक उत्तम उदाहरण ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल झोनचा संघ 266 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, ईस्ट झोनची सुरुवात अशी होती की सामना त्यांच्या बाजूनं झुकत असल्याचं वाटत होते. मात्र, एकही गडी न गमावता 161 धावा करणाऱ्या ईस्ट झोनचा संघ पुढील 105 धावांत सर्व 10 गडी गमावून अचानक कोसळला आणि संपूर्ण संघ 266 धावांवर येऊन थांबला. दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ देणाऱ्या कुमार कुशाग्रनंही गांभीर्य दाखवत 79 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 1 षटकारासह 67 धावांची शानदार खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 161 धावांची भक्कम शतकी भागीदारी रचली आणि ईस्ट झोनला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं.
2⃣6⃣6⃣- 2⃣6⃣6⃣
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 31, 2026
What a finish to the first innings 🔥
Yash Thakur gets the final wicket in style as the scores stay level!#DuleepTrophy | #CZvEZ
Scorecard ▶️ https://t.co/kyExeix2VY pic.twitter.com/Gm00zD3GRq
161 वरुन 266 वर ऑलआउट : जेव्हा ईस्ट झोन एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत होता, तेव्हाच वैभव सूर्यवंशीनं 161 धावांवर पहिला धक्का दिला. त्याच्या बाद होण्यानं विकेट्स पडण्यास सुरुवात झाली. 161 धावांवर शून्य गडी बाद असताना, ईस्ट झोनची धावसंख्या ढासळू लागली आणि मधल्या फळीतील फलंदाज मैदानात येताच आपल्या विकेट्स गमावत गेले. रियान परागनं थोडा संघर्ष करत 29 धावा केल्या, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला कोणत्याही फलंदाजानं साथ दिली नाही. परिणामी, एकेकाळी मजबूत स्थितीत असलेला संघ 266 धावांवर गारद झाला आणि पहिल्या डावात दोन्ही संघांच्या धावा बरोबरीत आल्या.
सेंट्रल झोनची धारदार गोलंदाजी : ईस्ट झोनच्या मानहानीकारक पराभवामागे सेंट्रल झोनच्या गोलंदाजांनी केलेलं शानदार पुनरागमन हे कारण होतं. हर्ष दुबेनं सर्वाधिक 4 तर आर्यन पांडे आणि यश ठाकुर यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. ईस्ट झोनचा हा डाव कोसळणं त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा धडा आहे, क्रिकेटमध्ये, शेवटची धाव पूर्ण होईपर्यंत सामना जिंकलेला मानला जात नाही. 161/0 च्या उत्कृष्ट पायावर संधी साधण्यात आलेलं अपयश या सामन्यात ईस्ट झोनला किती महागात पडेल, हे केवळ वेळच ठरवेल.
हेही वाचा :

