ETV Bharat / sports

व्वा रे BCCI चा न्याय! VHT मध्ये 5 सामन्यात 514 धावा करणाऱ्या खेळाडूला दिलं नाही संघात स्थान

देवदत्त पडिक्कलनं विजय हजारे ट्रॉफीच्या आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये चार शतकं झळकावली आहेत. त्यानं स्पर्धेत 102 पेक्षा जास्त सरासरीनं 514 धावा केल्या आहेत.

Devdutt Padikkal
देवदत्त पडिक्कल (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 4, 2026 at 3:42 PM IST

|

Updated : January 4, 2026 at 5:04 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई Devdutt Padikkal : बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीनं न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. नियमित कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या मालिकेसाठी संघात परतले आहेत. अय्यर अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच त्याला वनडे मालिकेत खेळण्याची परवानगी दिली जाईल. मालिकेसाठी संघ जाहीर होण्यापूर्वी, विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वनडे संघात समाविष्ट केलं जाऊ शकतं अशी अटकळ होती, परंतु अद्याप तसं झालेलं नाही.

देवदत्त पडिक्कलनं केल्या खोऱ्यानं धावा : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये, एक खेळाडू आहे जो फलंदाजीत खोऱ्यानं धावा काढत आहे, परंतु कोणीही त्याच्याबद्दल बोलत नाही. तो खेळाडू म्हणजे देवदत्त पडिक्कल. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पडिक्कलची बॅट सध्या मोठ्यानं बोलत आहे. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चार शतकं झळकावली आहेत आणि 102.8 च्या सरासरीने 514 धावा केल्या आहेत. तरीही त्याला वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात स्थान मिळालेलं नाही.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये पडिक्कलचा रेकॉर्ड कसा? : देवदत्त पडिक्कलचा विजय हजारे ट्रॉफीमधील रेकॉर्ड सुरुवातीपासूनच प्रभावी आहे. या स्टायलिश डावखुऱ्या फलंदाजानं या 50 षटकांच्या स्थानिक स्पर्धेत 33 सामने खेळले आहेत, 94.74 च्या सरासरीनं 2525 धावा केल्या आहेत. या काळात, त्यानं 25 डावांमध्ये 50+ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 12 शतकं आहेत. या प्रभावी विक्रमानंतरही, देवदत्त पडिक्कलनं अद्याप वनडे पदार्पण केलेलं नाही. पडिक्कलनं आधीच भारतासाठी कसोटी आणि टी-20 पदार्पण केलं आहे.

दमदार फलंदाजी विक्रम : पडिक्कलनं लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 13 शतकं झळकावली आहेत. पडिक्कलची सर्व 13 शतकं विजय हजारे ट्रॉफीमध्येच झाली आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. यासह, तो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतकं करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. शतकांच्या बाबतीत त्यानं कर्नाटकचा सध्याचा कर्णधार मयंक अग्रवाल (12) याला मागे टाकले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता फक्त अंकित बावणे आणि ऋतुराज गायकवाड हे देवदत्त पडिक्कलच्या पुढे आहेत. बावणेनं या स्पर्धेत 15 शतकं केली आहेत आणि ऋतुराजनं 14 शतकं केली आहेत. पडिक्कल भविष्यात या दोन्ही खेळाडूंना मागे टाकू शकतो.

हेही वाचा :

  1. वादाच्या पार्श्वभूमीवर टी-20 विश्वषचकासाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा; 'हा' खेळाडू बनला कर्णधार
  2. रुट-ब्रूकनं ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षेवर फेरलं 'पाणी'; खराब हवामानानं पहिल्या दिवसाच्या खेळात व्यत्यय
  3. बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल; म्हणे आमचेही सामने भारताबाहेर हलवा
Last Updated : January 4, 2026 at 5:04 PM IST