ETV Bharat / sports

'ऑपरेशन सफेद सागर' पाहिल्यानंतर 'ग्रुप कॅप्टन' सचिननं केली हवाई दलाची प्रशंसा; सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं...

नेटफ्लिक्सवरील 'ऑपरेशन सफेद सागर' ही सीरिज सध्या चर्चेत आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईवर आधारित असलेली ही सीरिज प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

Sachin Tendulkar
'ग्रुप कॅप्टन' सचिन तेंडुलकर (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : September 2, 2026 at 10:31 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली Sachin Tendulkar : नेटफ्लिक्सवरील 'ऑपरेशन सफेद सागर' ही सीरिज सध्या चर्चेत आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईवर आधारित असलेली ही सीरिज प्रेक्षकांना खूप आवडत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं ही सीरिज पाहिली. त्यानंतर त्यानं हवाई दलाची प्रशंसा केली आहे, ज्यात तो स्वतः सेवा बजावतो. 2010 मध्ये, भारतीय हवाई दलानं सचिन तेंडुलकरला ग्रुप कॅप्टन या मानद पदानं सन्मानित केलं होतं.

सचिननं भारतीय हवाई दलाविषयी काय लिहिलं? : ही सीरिज पाहिल्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांच्यासोबतचा स्वतःचा एक जुना फोटो पोस्ट केला. त्यानं लिहिलं, "प्रिय भारतीय हवाई दल, मी नुकतीच 'ऑपरेशन सफेद सागर' पाहिली. यामुळं मला विचार करायला लावला की, जे लोक तिथं दबाव आणि अनिश्चिततेखाली राहतात त्यांचं जीवन किती वेगळं असते, तर आपण बाकीचे शांतपणे झोपू शकतो आणि आपलं दैनंदिन जीवन जगू शकतो. मी अनेक वर्षांपूर्वी एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांना भेटलो होतो."

सचिननं पुढं लिहिलं, "आता ऑपरेशन सफेद सागरकडे मागे वळून पाहताना आणि कारगिल दरम्यान त्यांना व इतर अनेकांना काय भोगावं लागलं हे जाणून, मला त्या भेटीचं महत्त्व अधिकच जाणवतं. हे धैर्य विलक्षण आहे. त्यामागील शिस्त आणि मानसिक शक्ती देखील आश्चर्यकारक आहे. मी स्वतःला भारतीय हवाई दलाशी संबंधित असल्याबद्दल भाग्यवान समजतो आणि त्याची मूल्ये जाणतो. ही कथा पाहून मला अधिकच कृतज्ञ वाटते. तुम्ही आमच्यासाठी जे काही करता त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद!"

जिमी शेरगिल बी.एस. धनोआ यांच्या भूमिकेत : अभिनेता जिमी शेरगिल यांनी 'ऑपरेशन सफेद सागर'मध्ये बी.एस. धनोआ यांची भूमिका साकारली आहे. धनोआ त्यावेळी विंग कमांडर होते आणि कारगिल युद्धादरम्यान त्यांनी 17 व्या स्क्वाड्रन गोल्डन अॅरोजचं नेतृत्व केलं होतं. मिग-21 लढाऊ विमानांनी सुसज्ज असलेली ही स्क्वाड्रन 'ऑपरेशन सफेद सागर'चा भाग होती. त्यांनी 2016 ते 2019 या काळात हवाई दल प्रमुख म्हणूनही काम पाहिलं.

हेही वाचा :

  1. थायलंडविरुद्ध विजय मिळवताना पाकिस्तानला नाकीनऊ; गुणतालिकेत टीम इंडियाचा जलवा
  2. इंग्रजांनी केला वनडे इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग; आयरिश संघाविरुद्ध दमदार विजय
  3. तीन T20I सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; संजूचं संघात पुनरागमन तर वैभवलाही मिळालं स्थान