पुढील महिन्यात होणाऱ्या महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; 'हे' खेळाडू भारताला पुन्हा बनवणार विश्वविजेता
पुढील महिन्यात होणाऱ्या 2026 च्या महिला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Published : May 2, 2026 at 5:23 PM IST
मुंबई Team India Squad : पुढील महिन्यात होणाऱ्या 2026 च्या महिला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी टी-20 विश्वचषक यावर्षी इंग्लंडमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 12 जून रोजी सुरु होईल आणि अंतिम सामना 5 जुलै रोजी होणार आहे. हरमनप्रीत कौरला पुन्हा एकदा भारतीय संघाचं कर्णधार बनवण्यात आलं आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), श्री चरणी, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नंदिनी शर्मा, रुंधति रेड्डी, रेणुका ठाकुर, क्रांति गौड, श्रेयंका पाटिल, राधा यादव.
टी-20 विश्वचषकात भारताचे सामने :
- 14 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान
- 17 जून: भारत विरुद्ध नेदरलँड्स
- 21 जून: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- 25 जून: भारत विरुद्ध बांगलादेश
- 28 जून: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
The wait is over! ⌛
— BCCI Women (@BCCIWomen) May 2, 2026
🚨 Presenting #TeamIndia’s squad for the ICC Women’s T20 World Cup 2026 🇮🇳
Let's bring out the cheers for #WomenInBlue 🤩#T20WorldCup pic.twitter.com/vZTGtqeTZL
वनडे विश्वचषक 2025 संघाची मॅचविनर ठरलेल्या अमनजोत कौरला दुखापत झाल्याने तिच्या नसण्यानं संघाला मोठा फटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिकेसाठी अमनजोत कौरची बदली खेळाडू म्हणून काश्वी गौतमची निवड करण्यात आली होती, पण, काश्वीलाही दुखापत झाली. त्यामुळं तिची निवड करण्यात आली नाही. या दोघींशिवाय अष्टपैलू खेळाडू राधा यादव हिची संघात निवड करण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला 4-1 ने पराभव पत्करावा लागला. वुमन्स प्रीमियर लीग 2026 मध्ये अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेणाऱ्या नंदिनी शर्माला संधी देण्यात आली आहे. नंदिनीची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली असून, थेट टी-20 विश्वचषकात तिला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अरूंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड या वेगवान गोलंदाज आहेत. तर श्रीचरणी, श्रेयंका पाटील, शफाली वर्मा व राधा यादव या अष्टपैलू खेळाडू आहेत.
हेही वाचा -

