नवीन वर्षातील पहिल्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; 15 खेळाडूंना मिळाली संधी
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

Published : January 3, 2026 at 4:48 PM IST
मुंबई India Squad For NZ Series : BCCI च्या निवड समितीनं न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, नियमित कर्णधार शुभमन गिल संघात परतला आहे. दुखापतीमुळं तो दक्षिण आफ्रिका मालिकेला मुकला होता. त्यावेळी केएल राहुलनं कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, तो आता बरा झाला आहे आणि संघात परतला आहे. तो या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, श्रेयस अय्यरची उपलब्धता त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. त्याला अद्याप बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळालेले नाही. परंतु, वनडे मालिकेपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी आशा आहे.
🚨 News 🚨
— BCCI (@BCCI) January 3, 2026
India’s squad for @IDFCFIRSTBank ODI series against New Zealand announced.
Details ▶️ https://t.co/Qpn22XBAPq#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/8Qp2WXPS5P
रोहित आणि विराटकडून चांगली कामगिरी अपेक्षित : भारतीय संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे. दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि भरपूर धावा करत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहलीनं सलग दोन शतकं झळकावली आणि मालिकेत एकूण 302 धावा केल्या. यामुळं त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. दुसरीकडे रोहितनं मालिकेत दोन अर्धशतकं झळकावली. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दोघांकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार)*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल
What a way to start 2026. 🤩#RoKo, #RP17 and so many big guns are back in action. Captain #ShubmanGill is all set to lead a star-studded #TeamIndia in the upcoming ODI series against New Zealand. #INDvNZ 👉 1st ODI 👉 SUN, 11th JAN 2026 12.30 PM onwards pic.twitter.com/veBZF0hhcL
— Star Sports (@StarSportsIndia) January 3, 2026
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेचं वेळापत्रक : न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 11 जानेवारी रोजी वडोदरा इथं सुरु होईल. दुसरा वनडे सामना 14 जानेवारी रोजी राजकोट इथं आणि तिसरा सामना 18 जानेवारी रोजी इंदूर इथं खेळला जाईल. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यात कोहली आणि रोहित पुन्हा एकदा चमकतील.
हेही वाचा :

