ETV Bharat / sports

रुट-ब्रूकनं ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षेवर फेरलं 'पाणी'; खराब हवामानानं पहिल्या दिवसाच्या खेळात व्यत्यय

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघातील अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.

Australia VS England 5th Ashes Test
रुट-ब्रूकनं ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षेवर फेरलं 'पाणी' (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 4, 2026 at 12:30 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सिडनी Australia VS England 5th Ashes Test : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघातील अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांची सुरुवात निराशाजनक होती. मात्र, यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रूक यांच्यातील महत्त्वपूर्ण भागीदारीमुळं इंग्लंडला 211/3 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र खराब प्रकाश आणि पावसानं दिवसाच्या खेळात व्यत्यय आणला परिणामी तिसऱ्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही.

इंग्लंडची खराब सुरुवात : इंग्लंडचा डाव सुरु झाला तेव्हा बेन डकेट फक्त 35 धावांवर बाद झाला, मिशेल स्टार्कनं 27 धावांवर यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीकडे त्याला झेलबाद केलं. त्यानंतर जॅक क्रॉलीला 16 धावांवर मायकेल नेसरनं एलबीडब्ल्यू बाद केलं. त्यानंतर जेकब बेथेल 10 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि इंग्लंडची अवस्था 57/3 अशी दयनीय झाली.

रुट-ब्रूकनं इंग्लंडला सावरलं : इंग्लंड कठीण परिस्थितीत असतानाही, जो रुट आणि जॅक क्रॉलीनं डाव सावरला आणि हुशारीनं फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या स्टार फलंदाजांनी 154 धावांची नाबाद भागीदारी केली, ज्यामुळं इंग्लंडनं 3 बाद 211 धावांपर्यंत मजल मारली. रुट 72 आणि ब्रूक 78 धावांवर नाबाद होते. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, मायकेल नेसर आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

हवामानाचा सामन्यात व्यत्यय : सामन्यादरम्यान हवामानात बदल झाला, कमी प्रकाशामुळं चहापान लवकर सुरु झालं. दिवसाची सुरुवात चमकदार सूर्यप्रकाशानं झाली असली तरी, हळूहळू आकाशात ढग जमा झाले आणि 45 षटकांनंतर, उर्वरित खेळ रद्द करण्यात आला, ज्यामुळं पंचांनी खेळ थांबवला. दुसऱ्या दिवशी, इंग्लिश संघ मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल, तर यजमान संघ इंग्लंडच्या विकेट घेत त्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा :

  1. बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल; म्हणे आमचेही सामने भारताबाहेर हलवा
  2. AUS vs ENG: सिडनीमध्ये मोडली 137 वर्षांची परंपरा; स्टीव्ह स्मिथनं बदलला इतिहास
  3. वैभव सूर्यवंशीनं वयाच्या 14व्या वर्षी केला विश्वविक्रम; पाकिस्तानी खेळाडूला टाकलं मागे