ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड; शेवटच्या सामन्यात विजय मिळवत केली विश्वविक्रमाची बरोबरी

ऑस्ट्रेलियानं ओमानविरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या टी-20 विश्वचषक सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडच्या विक्रमाची बरोबरी केली आणि कर्णधार मिचेल मार्शनंही अर्धशतक झळकावून विक्रम केला.

Australia World Record
ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 21, 2026 at 9:24 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पल्लेकेले Australia World Record : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं 2026 च्या टी-20 विश्वचषकातून निरोप घेतला आहे. कांगारु संघ आधीच विश्वचषकातून बाहेर झाला आहे, परंतु त्यांना त्यांचा शेवटचा लीग सामना ओमानविरुद्ध खेळावा लागला, जो त्यांनी 9 विकेट्सच्या मोठ्या फरकानं जिंकला. 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघ टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडला आहे. दरम्यान, संघानं 2024 च्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून फक्त 9.4 षटकांत 100 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग : टी-20 विश्वचषकाच्या शेवटच्या लीग सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि ओमान एकमेकांसमोर आले. यात कांगारु कर्णधार मिशेल मार्शनं नाणेफेक जिंकली. तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल अशी अपेक्षा होती, परंतु घडलं उलट. मार्शनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ओमानला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितलं. त्यानंतर ओमान संघ त्यांचे पूर्ण 20 षटकंही खेळू शकला नाही आणि ते फक्त 104 धावांवर सर्वबाद झाले. यानंतर ऑस्ट्रेलियानं फक्त 9.4 षटकांत 115 धावा करत 9 विकेट्सनं सामना सहज जिंकला.

ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या विक्रमाशी केली बरोबरी : दरम्यान, विक्रमांबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियानं टी-20 विश्वचषकात 100 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा संयुक्तपणे सर्वात जलद पाठलाग करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. 2024 च्या टी-20 विश्वचषकात संघानं अमेरिकेविरुद्ध 116 धावांचं लक्ष्य फक्त 9.4 षटकांत पूर्ण केलं, म्हणजेच दोन्ही सामने 62 चेंडू शिल्लक असताना जिंकले. शिवाय, 2007 मध्ये केपटाऊनमध्ये श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियानं 58 चेंडू शिल्लक असताना 102 धावांचं लक्ष्य गाठलं. टी-20 विश्वचषकात 100 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा विजय आहे.

मिचेल मार्शनं कर्णधार म्हणून दोन सामन्यांमध्ये सलग दोन अर्धशतकं झळकावली : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शनं पुन्हा एकदा अर्धशतक झळकावलं. त्यानं 33 चेंडूत 64 धावा केल्या आणि नाबाद राहिला. त्यानं त्याच्या खेळीत सात चौकार आणि चार षटकार ठोकले. त्यानं यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. तो सलग दोन टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये सलग दोन अर्धशतकं करणारा पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला. पाकिस्तानच्या बाबर आझमनं यापूर्वी तीन वेळा ही कामगिरी केली आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक आणि भारताचा रोहित शर्मा यांनीही ही कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजचा शाई होपनं या वर्षी ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा :

  1. फुटसल म्हणजे काय, तो कसा खेळतात? हाच खेळ खेळताना झाला खासदाराचा मृत्यू!
  2. श्रीलंकेवर भारताचा एकहाती विजय; भारतीय संघाची फायनलमध्ये धडक
  3. T-20 वर्ल्ड कपच्या शेवटच्या सामन्यातही कांगारुंना धक्का बसणार? ओमानच्या कर्णधारानं सामन्यापूर्वी दिला मोठा इशारा