वेगवान गोलंदाज शापुर झदरान यांचं 38 व्या वर्षी दिल्लीत निधन; क्रिकेट विश्वानं गमावला योद्धा
वेगवान गोलंदाज शापुर झदरान यांचं 38 व्या वर्षी दिल्लीत निधन झालंय. त्यांना हिमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टियोसाइटोसिस नावाचा दुर्मिळ आजार होता.

Published : July 7, 2026 at 3:40 PM IST
मुंबई : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज शापुर झदरान यांचं दिल्लीतील रुग्णालयात 38 वर्षांच्या अल्प वयात निधन झालं. त्यांचा 39 वा वाढदिवस केवळ एक दिवस राहिला होता. दुर्मिळ रोग हिमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टियोसाइटोसिस (HLH) शी दीर्घकाळ लढा देत असताना त्यांचं निधन झालं. त्यांचे धाकटे भाऊ घमाई झदरान यांनी ही दुःखद बातमी दिली.
إِنَّا لِلّهِ وَإِنَّـا إِلَيْهِ رَاجِعُونَ
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 7, 2026
With profound grief and deep sorrow, the Afghanistan Cricket Board mourns the passing of former Afghanistan fast bowler Shapoor Zadran.
Shapoor Zadran was one of the foundation-laying figures of Afghanistan cricket, whose dedication,… pic.twitter.com/iPIAJ6HLkq
अफगाण क्रिकेटमध्ये पोकळी : शापुर झदरान हे अफगाणिस्तान क्रिकेटच्या 2000 आणि 2010 च्या दशकातील एक ओळखीचे चेहरे होते. 6 फूट 2 इंच उंची, लांब केस आणि लांब रन-अप घेऊन ते वेगानं धावत गोलंदाजी करणत होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डनं (ACB) त्यांना 'पायाभूत योगदान देणारे' खेळाडू म्हणून सन्मानित केलं आहे. 2009 ते 2020 या कालावधीत त्यांनी 44 एकदिवसीय (ODI) आणि 36 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 80 बळी घेतले होते. विशेषतः 2015 च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये अफगाणिस्तानचे प्रमुख गोलंदाज म्हणून 10 विकेट्स घेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 2010 ते 2016 दरम्यान त्यांनी चार टी20 विश्वकरंडक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि 9 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानमध्ये गिरवले किक्रेटचे धडे : शापुर यांचा जन्म अफगाणिस्तानातील लोगार प्रांतात झाला. युद्धामुळं ते पाकिस्तानातील पेशावरला स्थलांतरित झाले. तेथे अरबाब नियाज स्टेडियमवर त्यांनी क्रिकेटचे धडे घेतले. सुरुवातीला त्यांना पाकिस्तानसाठी खेळण्याची इच्छा होती आणि शोएब अख्तर हे त्यांचे आदर्श होते. मात्र, इकबाल सिकंदर यांच्या मार्गदर्शनाने ते अफगाणिस्तानला परतले.
Afghanistan Cricket Board have confirmed the passing of legendary cricketer Shapoor Zadran💔 pic.twitter.com/zo5jmkIkFA
— Cricbuzz (@cricbuzz) July 7, 2026
2012 मध्ये क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत शापुर म्हणाले होते, “ट्रायलमध्ये 500 खेळाडू पाहून मी थोडा वेडा झालो. मी स्वतःला म्हणालो, ‘शापुर, या 500 मधून तुला संधी मिळणे अशक्य आहे!’ पण देवाची प्रार्थना केली आणि मी टॉप 25 मध्ये आलो. मी कुटुंबाला सांगितलं नव्हतं, फक्त कामासाठी जातो, असं सांगून ट्रायल दिली.”
शापुर यांची कामगिरी : 2009 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध ODI डेब्यूत त्यांनी 4/24 अशी करिअर-बेस्ट कामगिरी केली. टी20 मध्ये 2010 मध्ये आयर्लंडविरुद्ध डेब्यू केला आणि 2018मध्ये बांगलादेशविरुद्ध 3/40 अशी सर्वोत्तम कामगिरी केली. शापुर यांनी राशिद खानसह अनेक तरुण खेळाडूंना मार्गदर्शन केलंय. राशिद खान, अश्गर अफगाण, हशमतुल्ला शाहिदी, रिचर्ड पायबस यांसारख्या दिग्गजांनी त्यांच्या उपचारकाळात भेट घेतली. जून महिन्यात भारत दौऱ्यावर असताना अफगाण टीमनं रुग्णालयात जाऊन त्यांना भेट दिली होती.
Really sad to hear about the passing of Shapoor Zadran. One of the main architects behind Afghanistan's rise in world cricket, his contribution to the game and the team's journey will always be remembered. A life dedicated to the sport. May his soul rest in peace. Heartfelt…
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) July 7, 2026
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डनं शोकसंदेशात म्हटलं आहे, “शापुर झदरान हे अफगाण क्रिकेटचे पाया रचणारे होते. त्यांच्या समर्पण, उत्साह आणि धैर्याने देशातील क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. मैदानावर सन्मान, शौर्य आणि अभिमानानं खेळलं. तरुण खेळाडूंसाठी ते प्रेरणास्रोत होते.”
शापुर यांच्या निधनानं अफगाण क्रिकेट समुदायासह संपूर्ण क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचा लढाऊ वृत्ती, निर्धार आणि खेळाप्रती प्रेम पुढील पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील, अशा भावना किक्रेटप्रेमी व्यक्त करताय.
हे वाचलंत का :

