सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचे क्रिकेटपटू सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक; पाहा व्हिडिओ
आयसीसी टी-20 विश्वचषकात, भारतीय क्रिकेट संघानं त्यांच्या शेवटच्या सुपर-8 सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करुन उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

Published : March 4, 2026 at 3:20 PM IST
मुंबई Siddhivinayak Temple : आयसीसी टी-20 विश्वचषकात, भारतीय क्रिकेट संघानं त्यांच्या शेवटच्या सुपर-8 सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करुन उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना आता इंग्लंडशी होणार आहे. आतापर्यंत, या स्पर्धेत एका भारतीय खेळाडूच्या फॉर्मनं सर्वाधिक लक्ष वेधलं आहे आणि तो दुसरा कोणी नसून सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आहे, ज्याला फक्त एक अर्धशतक झळकावता आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी, अभिषेक शर्मानं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जात गणपत्ती बाप्पाचं दर्शन घेतलंय.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Members of Indian Cricket Team offered prayers at Shree Siddhivinayak Ganapati Temple. The team will face England in the semi-final match of #ICCT20WorldCup2026 tomorrow at Wankhede Stadium in Mumbai.
— ANI (@ANI) March 4, 2026
(Video Source: Siddhivinayak Temple Trust) pic.twitter.com/DkcTfOspSd
इशान आणि अक्षर यांनी अभिषेकसोबत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन : सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि अक्षर पटेलसह दर्शनासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेले. तिन्ही खेळाडूंनी उपांत्य फेरीच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी गणपत्ती बाप्पला आशीर्वाद मागितले. या महत्त्वाच्या सामन्यात अभिषेक शर्मावर सर्वांचं लक्ष असेल, जो त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा सामना ठरणार आहे. शिवाय, आतापर्यंत फक्त दोन सामन्यांमध्ये फलंदाजीनं चांगली कामगिरी करु शकलेला ईशान किशनही मोठी खेळी करेल अशी अपेक्षा आहे.
PHOTO | Members of the Indian cricket team paid a visit to Siddhivinayak temple in Mumbai ahead of their semi-finals against England tomorrow.
— Press Trust of India (@PTI_News) March 4, 2026
Source: Third Party pic.twitter.com/9UH7RgtlBW
घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा उत्कृष्ट रेकॉर्ड : टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचा घरच्या मैदानावर रेकॉर्ड खूपच प्रभावी आहे. टीम इंडियानं घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध एकूण 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 10 जिंकले आहेत आणि फक्त सहा गमावले आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये दोन टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियानं एक जिंकला आणि दुसरा गमावला आहे.
Mumbai, Maharashtra: Ahead of India’s semi-final match, Ishan Kishan, Abhishek Sharma, and Axar Patel visited Shri Siddhivinayak Temple in Mumbai to seek blessings of Lord Ganesha pic.twitter.com/NLLxRcIVT3
— IANS (@ians_india) March 4, 2026
हेही वाचा :

