ETV Bharat / sports

'सेहवाग-द्रविड' कांगारुंविरुद्ध उतरणार मैदानात; BCCI नं केली संघाची घोषणा

बीसीसीआयनं ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

India U19 Squad
सेहवाग-द्रविड कांगारुंविरुद्ध उतरणार मैदानात (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : August 27, 2026 at 3:29 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई India U19 Squad : बीसीसीआयनं ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. पुरुष निवड समितीनं ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघांची घोषणा केली आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षांखालील संघ तीन वनडे आणि दोन बहुदिवसीय सामने खेळणार आहे. दोन्ही मालिकांसाठी भारतीय 19 वर्षांखालील संघांची घोषणा करण्यात आली आहे. तिन्ही वनडे सामने आणि पहिला बहुदिवसीय सामना राजकोटमध्ये खेळला जाईल, तर दुसरा बहुदिवसीय सामना अहमदाबादमध्ये होणार आहे.

लक्ष्य असेल संघाचा कर्णधार : वनडे सामन्यांसाठी लक्ष्य रायचंदानीकडे कर्णधारपद, तर उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. बहुदिवसीय सामन्यांमध्ये लक्ष्य आणि यशवर्धन यांच्यात जबाबदाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. याचा अर्थ, बहुदिवसीय सामन्यांमध्ये यशवर्धन चौहान भारतीय 19 वर्षांखालील संघाचं कर्णधारपद भूषवेल, तर लक्ष्य रायचंदानी उपकर्णधार असेल.

सेहवाग आणि द्रविडच्या मुलांना संधी : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या मुलांनाही वनडे सामन्यांसाठी निवडलेल्या भारतीय 19 वर्षांखालील संघात संधी देण्यात आली आहे. निवड समितीनं सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना संघात स्थान दिलं आहे. अन्वयचा संघात यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, बहुदिवसीय सामन्यांसाठी निवडलेल्या संघात आर्यवीर आणि अन्वय यांचा समावेश नाही. आर्यवीर या मोसमात दिल्ली प्रीमियर लीग (DPL) मध्ये वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळला होता.

भारताचा वनडे सामन्यांसाठीचा 19 वर्षांखालील संघ : लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, रोहित यादव, शविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपती व्यंकट, काव्या पटेल.

बहु-दिवसीय सामन्यांसाठी भारताचा अंडर 19 संघ : यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), अभिप्रय बिस्वास (यष्टीरक्षक), रोहित यमन, रोहित, इंद्रकुमार, इंद्रकुमार राघवेंद्र, प्रियांशू सिंग, मोहित उलवा, आर्यन यादव.

ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील भारत दौऱ्याचं वेळापत्रक :

  • पहिला वनडे सामना: 18 सप्टेंबर, 2026, राजकोट (सकाळी 9 वाजता)
  • दुसरा वनडे सामना: 21 सप्टेंबर, 2026, राजकोट (सकाळी 9 वाजता)
  • तिसरा वनडे सामना: 23 सप्टेंबर, 2026, राजकोट (सकाळी 9 वाजता)
  • पहिला बहुदिवसीय सामना: 27-30 सप्टेंबर, 2026, राजकोट (सकाळी 9:30 वाजता)
  • दुसरा बहुदिवसीय सामना: 5-8 ऑक्टोबर, 2026, अहमदाबाद बी मैदान (सकाळी 9:30 वाजता)

हेही वाचा :

  1. 'क्रिकेटच्या पंढरी'त हॅटट्रिक करण्यासाठी शेजारी उतरणार मैदानात; यजमान मालिकेत अभेद्य आघाडी घेणार?
  2. 'जो खेलेगा वो खिलेगा' पंतप्रधान मोदींचा तरुण खेळाडूंशी संवाद; ऑलिम्पिकमधील सहभाग वाढवण्यावर भर
  3. WAPL 2026: रामोजी ग्रुपनं सर्वाधिक बोली लावत विकत घेतला अमरावती संघ; कधी सुरु होणार ही लीग?