ETV Bharat / spiritual

नवीन वर्षातील पहिला सोमवार: 'मेष ते मीन' सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?, वाचा राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 12:10 AM IST

3 Min Read
Choose ETV Bharat
  • मेष (ARIES) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज आपण खूप संवेदनशील झाल्यानं कोणाचं बोलणं आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ आणि शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्त्री वर्गापासून जपून राहावे लागेल.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज शरीर आणि मन स्वस्थ राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडं अधिक लक्ष दिलं तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास आणि सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता याचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल. मित्र आणि हितचिंतकांचा सहवास घडेल. व्यवसायात उत्साह आणि प्रसन्नता वाढेल. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. मित्र आणि स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
  • सिंह (LEO) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. विदेशातून काही बातमी येईल. संयमित राहा. स्त्रीयांशी सावधपणे व्यवहार करा. आज खर्चात वाढ होईल.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात आहे. आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. संततीकडून चांगली बातमी मिळेल.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशम भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आईकडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. आज शारीरिक थकवा, आळस आणि मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. शक्यतो आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. राजकीय समस्या उदभवतील.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन आणि गाठी भेटी यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. मोठया धनलाभाची संभावना आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून भरपूर प्राप्ती होईल. मान- सन्मान वाढतील. कामातील सफलते बरोबरच स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आजचा दिवस कार्य सिद्धीच्यादृष्टीनं शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगलं राहील. तन-मन उत्साही आणि आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. नोकरीत सहकार्यांच्या मदतीने कार्य तडीस न्याल. कामानिमित्त पैसा खर्च होईल.
  • मीन (PISCES) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर - सट्टा बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल मात्र राखावा लागेल.