ETV Bharat / spiritual

तिसरा श्रावणी सोमवार आणि संकष्टी चतुर्थीचा दुर्मिळ योगायोग; शिवलिंगावर वाहा 'ही शिवामूठ?, चंद्रोदय कधी?

श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून आज संकष्टी चतुर्थी आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहली जाते. आता तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहायची.

shravan Somwar 2026
तिसरा श्रावणी सोमवार (file Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 30, 2026 at 3:02 PM IST

|

Updated : August 30, 2026 at 4:11 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद Shravan Month : श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना (Shravan) मानला जातो. यंदा गुरूवार, 13 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू झाला आहे. तर शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिना संपणार आहे. या महिन्यात चार श्रावणी सोमवार (Shravan Somwar) आले आहेत.

शिवामूठ करण्याची पद्धत (Shivamuth) : विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

  • तिसरा श्रावणी सोमवार : 31 ऑगस्ट 2026 तिसऱ्या सोमवारी शिवामूठ 'मूग' वाहावी.
  • शिवामूठ वाहताना म्हणायचा मंत्र : "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा" असं तीन वेळा म्हणावं.
  • चंद्रोदय वेळ : संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री 8:52 वाजता होणार आहे.

'या' पद्धतीनं करा महादेवाची पूजा : सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. महादेवाला गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा. यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. तर प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाला शिवामूठ नक्की अर्पण करा.

श्रावण महिन्याचं धार्मिक महत्व : श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो. या काळात शिवभक्त मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक, दूध, बेलपत्र, धोत्र्याचं फूल, भस्म आणि फुले अर्पण करतात. अनेकजण श्रावणातील सोमवारचे व्रत पाळतात, रूद्राभिषेक करतात आणि 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करतात.

टीप - (ही माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.)

हेही वाचा -

Last Updated : August 30, 2026 at 4:11 PM IST