ETV Bharat / spiritual

मकर संक्रांतीला 'या' राशींवर होणार सूर्य आणि शनिची कृपा; नवे प्रकल्प होतील यशस्वी, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

दैनंदिन राशीभविष्यावरून रोजच्या घडामोडींचा अंदाज येतो. तर मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल आठवडा? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील साप्ताहिक राशीभविष्यात.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 11, 2026 at 12:08 AM IST

6 Min Read
Choose ETV Bharat

मेष (Aries) : मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या आघाडीवर परिस्थिती काहीशी कमकुवत राहण्याची शक्यता असल्यानं, शरीराच्या कुरबुरींकडं दुर्लक्ष करू नका आणि प्रकृतीची विशेष काळजी घ्या. तुमची आर्थिक स्थिती मात्र उत्तम राहील. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील, जे तुमच्या भविष्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील. प्रेमसंबंधांमध्ये मात्र काहीसा तणाव जाणवू शकतो. जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता असल्यानं संवाद जपून साधा. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे नाते सांभाळण्याची गरज आहे, अन्यथा मोठ्या वादाला तोंड फुटू शकते. व्यापार करणाऱ्यांनी आपल्या भागीदाराशी जुळवून घेणं हिताचं ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णमय असून पद-प्रतिष्ठेत वाढ होईल आणि पदोन्नतीचे योगही जुळून येतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मानसिक तणावाचा असू शकतो, विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी संयम राखावा.

वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवू शकतात. विशेषतः डोळे किंवा नाक यांच्याशी संबंधित मौसमी आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळं वेळीच उपचार घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा भाग्याचा ठरेल, विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ प्रगतीचा असून नवीन उद्योग किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीत असलेल्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा आणि चांगल्या संबंधांचा मोठा फायदा मिळेल. प्रेमसंबंधात तुम्ही आपल्या मनातील भावना जोडीदारासमोर मोकळेपणाने मांडाल आणि त्यांचेही म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. गृहस्थ जीवनात काही प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळं वागण्या-बोलण्यात सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकतं, त्यामुळं एकाग्रतेवर भर द्यावा लागेल.

मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. आरोग्याकडं अजिबात दुर्लक्ष करू नका, विशेषतः गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास तुम्हाला सतावण्याची शक्यता आहे. नियमित हलका व्यायाम करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ मात्र अत्यंत लाभदायक असून व्यवसायात मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी परिस्थिती अनुकूल राहील आणि पगारवाढीची (इन्क्रिमेंट) आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ थोडा कमकुवत आहे. प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या विषयावरून बाचाबाची होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन मात्र सुखकर असेल आणि जोडीदाराची साथ लाभेल. आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही नवीन ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विचलित करणारा ठरेल, अभ्यासात मन न लागल्यानं शैक्षणिक उद्दिष्टे गाठण्यात अडचणी येऊ शकतात.

कर्क (Cancer) : कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फले देणारा असेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःसोबतच आपल्या माता-पित्यांच्या प्रकृतीचीही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तुमची आर्थिक स्थिती समाधानकारक राहील आणि व्यवसायातून चांगला नफा मिळण्याचे योग आहेत. मात्र, भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या पार्टनरशी असलेल्या मतभेदांमुळं काही समस्या जाणवू शकतात. नोकरीत कामाचे योग्य कौतुक न झाल्यानं किंवा सन्मानात कमतरता भासल्यानं तुमचं मन काहीसे अस्वस्थ राहू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीत काळ सामान्य असून तुम्ही जोडीदारासोबत प्रवासाचा बेत आखू शकता. वैवाहिक जीवनात तणाव संभवतो, विशेषतः सासरच्या मंडळींशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कष्टाचा असला तरी, त्यांनी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ त्यांना नक्कीच मिळेल.

सिंह (Leo) : सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ आणि फलदायी ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या उत्साही राहाल. व्यापारात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. आर्थिक ओघ सतत सुरू राहिल्यानं तुमची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जुन्या गुंतवणुकीतून या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात रोमांस वाढेल आणि तुम्ही प्रिय व्यक्तीसाठी अधिक वेळ द्याल. व्यवसायाची भरभराट होईल, मात्र गृहस्थ जीवनात जोडीदाराच्या बिघडत्या प्रकृतीमुळं काहीसा तणाव निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य असला तरी, आयटी, मेकॅनिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आणि यशाचा ठरेल.

कन्या (Virgo) : कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा काहीसा नरम-गरम राहील. आरोग्याकडं दुर्लक्ष करू नका, योग्य आहार आणि नियमित व्यायामावर भर द्या. व्यावसायिकांसाठी हा काळ कामाचा व्याप वाढवणारा असेल, नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि सदस्यांमध्ये एकोपा दिसून येईल. आर्थिक बाबतीत चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्न सुरू राहील तरीही दैनंदिन खर्च वाढल्यानं बजेट कोलमडू शकते. प्रेमसंबंधात गुप्तता पाळण्याचा तुमचा प्रयत्न असेल. कुटुंबातील सदस्यांबद्दलचा ओलावा वाढेल आणि जोडीदारासोबत बाहेर फिरायला गेल्यानं नात्यात अधिक गोडवा येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे, अन्यथा शैक्षणिक नुकसान होऊ शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या जातकांना अधिक परिश्रम आणि एकाग्रतेची गरज आहे.

तूळ (Libra) : तुळा राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याबाबत गाफील राहू नका, पोटात दुखणे किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील काही अपरिहार्य गोष्टींवर अचानक मोठा खर्च करावा लागल्यानं आर्थिक ताण येऊ शकतो. व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय अत्यंत सावधगिरीने चालवणे आवश्यक आहे. विशेषतः भागीदारीत वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला असून कामात तुमचं मन लागेल, ज्यामुळं कौटुंबिक सुख-शांतीही टिकून राहील. प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी अनावश्यक वाद टाळा, अन्यथा नाते बिघडू शकते. वैवाहिक जीवनात गृहक्लेश किंवा मानसिक तणाव निर्माण झाल्यानं घरात अशांतीचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थी अभ्यासात एकाग्र होण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. चुकीच्या संगतीपासून दूर राहणं हिताचं ठरेल.

वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. प्रकृतीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण बदलत्या हवामानामुळं सर्दी, खोकला किंवा तापासारख्या समस्या उद्भवू शकतात. कौटुंबिक गरजांवर मोठा खर्च होण्याची शक्यता असल्यानं आर्थिक नियोजन कोलमडू नये म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून त्यांच्या सर्व योजना यशस्वी होतील आणि मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयातील राजकारणापासून दूर राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. प्रेमसंबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल आणि तुम्ही विवाहाचा विचार करू शकता. वैवाहिक जीवन सुखाचे असेल आणि जोडीदारासोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. विद्यार्थ्यांचा कल अभ्यासासोबतच कला, क्रीडा यांसारख्या अवांतर गोष्टींकडं अधिक राहील.

धनु (Sagittarius) : धनु राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संघर्षाचा असू शकतो. आरोग्याकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, विशेषतः पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आर्थिक स्थिती स्थिर असली तरी धनप्राप्तीसाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा राहील. नोकरीत असमाधान वाटल्यानं तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. वैयक्तिक संबंधांमध्ये प्रिय व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात आणि कौटुंबिक नात्यातही दुरावा येण्याची शक्यता आहे. वैवाहिक संबंध सुधारण्याचे तुमचे प्रयत्न या काळात फारसे यशस्वी होताना दिसणार नाहीत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कठीण असून अभ्यासातून मन भरकटण्याची दाट शक्यता आहे. चुकीच्या गोष्टींकडं ओढ वाढू शकते, तसेच भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने संयम ठेवा.

मकर (Capricorn) : मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल. आरोग्याबाबत सावध राहा आणि श्वसनाचे किंवा फुफ्फुसांचे आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा. व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल आणि व्यवसायाचा विस्तार होईल, मात्र नोकरी करणाऱ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामात मन न लागल्यानं अस्वस्थता जाणवेल. आर्थिक बाबतीत कुटुंबातील सदस्यांच्या किंवा भावंडांच्या मागण्या पूर्ण करताना तुमचा बराचसा पैसा खर्च होऊ शकतो, ज्यामुळं चिडचिड होईल. प्रेमसंबंधात तुम्ही आपल्या मनातील सुप्त भावना जोडीदारासमोर व्यक्त कराल, ज्याचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी संवाद साधल्यानं तुमचं मन हलके होईल आणि समस्या सुटण्यास मदत होईल. पालकांचा सल्ला या काळात मोलाचा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम असून अभ्यासात चांगली प्रगती होईल.

कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा बरा राहील. जर तुम्ही काही काळापासून आजारी असाल, तर या आठवड्यात आरोग्यात सुधारणा होईल. जोडीदाराच्या प्रकृतीबाबतही तुम्हाला समाधान वाटेल. व्यावसायिकांना नवीन संधी प्राप्त होतील, ज्यामुळं व्यापारात वाढ होईल. आर्थिक स्थिती मध्यम राहील, किरकोळ खर्च चालू राहतील. खाजगी संबंधांच्या बाबतीत काळ थोडा कठीण असून जोडीदारासोबतचे संबंध बिघडू शकतात. कुटुंबातही एखाद्या कारणावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात शांतता राखण्यासाठी संयम ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांवर या आठवड्यात जबाबदाऱ्यांचा बोजा अधिक असेल, ज्यामुळं अभ्यासाकडं दुर्लक्ष होऊ शकते. घरात गृहक्लेश होण्याची शक्यता असल्यानं वादाच्या प्रसंगांपासून दूर राहणेच आपल्या हिताचं ठरेल.

मीन (Pisces) : मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा उत्साहाचा आणि प्रगतीचा असेल. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, फक्त तेलकट आणि बाहेरील खाद्यपदार्थ टाळणे हिताचं ठरेल. व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत चांगला असून तुम्ही व्यवसायानिमित्त लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मानसिक ताण कमी जाणवेल आणि वातावरण खेळीमेळीचं राहील. कौटुंबिक संबंध सुधारतील, भावंडांसोबत बाहेर फिरण्याचा बेत आखला जाईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल आणि मुलांच्या प्रगतीमुळं मन समाधानी राहील. आर्थिक आघाडीवर हा आठवडा भाग्याचा असून उत्पन्नाचे स्रोत वाढतील, ज्यामुळं तुमची बचतही वाढेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल, मात्र आठवड्याच्या मध्यात थोडा विचलन जाणवू शकते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळण्याचे शुभ संकेत आहेत.