ETV Bharat / spiritual

श्रीकृष्ण जन्माष्टमी 2026 कधी?, जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि गोपाळकाला

हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला होता. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) आहे. जाणून घ्या काय आहे जन्माष्टमी तिथी आणि मुहूर्त...

krishna janmashtami 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी 2026 (ETV Bharat (English))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 2, 2026 at 3:33 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

krishna janmashtami 2026 : श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) भारतात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. विशेष म्हणजे वृंदावन, बरसाना, मथुरा आणि द्वारका येथे जन्माष्टमी साजरी केली जाते. जन्माष्टमीनिमित्त येथील मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. रात्रीचं जागरही केलं जातं. जन्माष्टमी हा सण श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या दिवशी श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते.

अशी करा श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजा : जन्माष्टमीला सकाळी उठून स्नान करुन दिवसभर उपवास करावा. भगवान श्रीकृष्णाला गंगेच्या पाण्यानं आणि दुधानं स्नान घालून नवीन वस्त्रं परिधान करुन त्यांना मोरमुकुट, बासरी, वैजयंती माळा, तुळशीदळ कुंडल इत्यादींनी सजवावं. तसेच भगवान श्रीकृष्णाच्या झुल्याला फुलांच्या माळांनी सजवा. पूजेमध्ये श्रीकृष्णाला फळं, फुलं, मखाणा, लोणी, साखर, मिठाई, सुका मेवा इत्यादी अर्पण करा आणि धूप-दीप लावा. यानंतर रात्री 12 नंतर पुन्हा श्रीकृष्णाची पूजा करुन त्यांना झुल्यावर झुलवा आणि आरती करुन नारळ फोडा. यानंतर प्रसादाचं वाटप करुन रात्री भजन-कीर्तन करुन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करा.

जन्माष्टमी शुभ मुहूर्त : श्री कृष्ण जन्मोत्सवाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त 4 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजून 57 मिनिटांनी सुरू होईल. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 43 मिनिटांपर्यंत मुहूर्त असणार आहे. या काळात तुम्ही बाळ श्रीकृष्णाची पूजा करू शकता.

जन्माष्टमी 2026 कथा : आख्यायिकेनुसार, भगवान विष्णूचे आठवे अवतार श्रीकृष्णाचा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात, मथुरेत देवकी आणि वसुदेवाच्या पोटी जन्म झाला. त्यावेळेस, राजा कंसानं आपल्या बहिणीला देवकीला, तिच्या पतीसोबत कैदेत ठेवलं होतं. कारण आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल. कंसाच्या भीतीमुळं कृष्णाचा जन्म होताच वासुदेवानं त्याला एका टोपलीत ठेवून यमुना नदी पार करून गोकुळात, नंद आणि यशोदेकडं सुखरूप पोहोचवलं. तिथं कृष्णाला यशोदेच्या मुलीसोबत बदलण्यात आले आणि वासुदेव परत कंसाकडं आले. अशाप्रकारे, कृष्णानं बालपणी अनेक लीला केल्या. कंसाचा वध करून जनतेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केलं.

कधी आहे गोपाळकाला? : यंदा 5 सप्टेंबर 2026 रोजी शनिवार, म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडीचा मोठा उत्सव आयोजित केला जातो. चौकाचौकात उंच मडक्यामध्ये दही, दूध, आणि लाह्या भरून हंडी टांगली जाते. 'गोविंदा पथके' मानवी मनोरे रचून ही हंडी फोडतात. हा सण एकता, बंधुभाव आणि समतेचे प्रतीक मानला जातो.

(टीप - ही माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.)

हेही वाचा -

  1. श्रावणी सोमवार : भीमाशंकर मंदिरात महापूजा अन् दुग्धाभिषेक; दर्शनासाठी हजारो भाविक पहाटेपासून दाखल
  2. दक्षिण काशी हरिहरेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी; जाणून घ्या, आख्यायिका, इतिहास अन् श्रद्धेचा अद्भुत संगम!
  3. सोमनाथ ते घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंग यात्रा; असा करा बारा मंदिरांचा प्रवास, जाणून घ्या मार्ग अन् नियोजन