'मेष ते मीन' सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?, वाचा राशीभविष्य
आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Published : May 28, 2026 at 2:33 AM IST
मेष (ARIES) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भावात असेल. आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याचबरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार व अती उत्साहाला आवर घालावा लागेल. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश व लाभ मिळेल. आज शक्यतो बौद्धिक चर्चा करताना वाद टाळून समाधानी वृत्तीचा स्वीकार करणे उचित ठरेल.
वृषभ (TAURUS) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. स्त्रीयांना माहेरहून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्टया आनंदात राहाल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन (GEMINI) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या भावात असेल. आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संततीच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद - विवाद यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थतेमुळं उत्साहात कमतरता जाणवेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे चांगला आहे.
कर्क (CANCER) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भावात असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणं किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. स्त्री किंवा वाणीमुळं एखादे संकट उभं राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाशाचा त्रास संभवतो.
सिंह (LEO) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या भावात असेल. आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रांबरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस नवीन काम किंवा योजना स्वीकारण्यास अनुकूल आहे. आज संगीतात विशेष रूची राहील.
कन्या (VIRGO) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भावात असेल. कौटुंबिक सुख - शांती व आनंद यामुळं आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे भोजन मिळेल. आयात - निर्यात व्यापारात चांगले यश मिळेल. परंतु वाद - विवाद, चर्चा यात उग्रता दाखवू नका.
तूळ (LIBRA) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भावात असेल. आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिकदृढता असेल व त्यामुळं कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मौज - मजेची साधने व मनोरंजनासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास रोमांचक व आनंददायी असेल.
वृश्चिक (SCORPIO) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भावात असेल. आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. एखादी दुर्घटना संभवते. कुटुंबीय किंवा सगे - सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावं लागेल. प्रत्येक विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही.
धनू (SAGITTARIUS) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल. आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. पत्नी किंवा संतती ह्यांच्या कडून लाभ संभवतो.
मकर (CAPRICORN) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्यानं पदोन्नती संभवते. सरकार, मित्र किंवा संबंधितांकडून फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. संततीची प्रगती पाहून आनंदित व्हाल.
कुंभ (AQUARIUS) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज आपण जरी शारीरिकदृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिकदृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. मौज - मजा तसेच सहलीसाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. प्रतिस्पर्ध्यांबरोबर चर्चेत सहभागी होऊ नका. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल.
मीन (PISCES) : तूळ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात भावात असेल. आज अवैध कामापासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावे. प्रकृतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. कुटुंबियांशी असणार्या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका. आपणास योग्य दिशा सापडण्यासाठी प्रयत्न करा.

