'या' 4 राशींना मिळणार यश आणि आर्थिक लाभ; वाचा आजचं राशीभविष्य
आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.
आजचं राशीभविष्य (File Photo)

Published : July 9, 2026 at 12:05 AM IST
- मेष (ARIES) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. पण अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडं सुद्धा लक्ष द्यावं लागेल. धन प्राप्ती संभवते.
- वृषभ (TAURUS) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिकदृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळं मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद झाल्यानं घरातील वातावरण कलुषित होईल. कष्टाच्या मानानं अपेक्षित प्राप्ती होणार नाही. त्यामुळं आर्थिक चिंता निर्माण होईल. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय आज घेऊ नये.
- मिथुन (GEMINI) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल. विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पत्नी व संतती यांच्याशी सुसंवाद राहिल्यानं दांपत्य जीवनात गोडवा निर्माण होईल.
- कर्क (CANCER) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आईकडून लाभ होईल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. धन व प्रसिद्धी वाढेल.
- सिंह (LEO) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारीमुळं अस्वस्थता अनुभवाल. नोकरी - व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळं प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मांगलिक कार्य किंवा प्रवास यामुळं मनाची अशांती दूर होईल.
- कन्या (VIRGO) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज आपण एखादे काम हाती घेणं हिताचं ठरणार नाही. बाहेरच्या खाण्यामुळं प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रू पासून सावध राहा. आग व पाणीपासून जपून राहा. सरकार विरोधातील काम किंवा अवैध प्रवृत्ती यामुळं संकट ओढवेल.
- तूळ (LIBRA) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं आपणास खूप आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मान - सन्मान प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाची उब व सहवास यामुळं आपण आनंदित व्हाल.
- वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासानं पूर्णपणे भरलेलं असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू यांच्यावर आपण मात करू शकाल. कामात सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य मिळेल. मित्र - मैत्रिणींचा सहवास तसेच प्रणयालापामुळं आपला आनंद व्दिगुणित होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतीत. प्रकृतीत सुधारणा होईल.
- धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्यानं निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. प्रणयासाठी मात्र अनुकूलता लाभेल. प्रिय व्यक्तीसह सुखद क्षणांचा अनुभव घेता येईल. साहित्य व लेखन क्षेत्रात रस राहील. वाद - विवाद व बौद्धिक चर्चा यापासून दूर राहणे हिताचं होईल.
- मकर (CAPRICORN) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज उत्साह व स्फूर्तीचा अभाव असल्यानं अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्यानं मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही. स्त्रीवर्गाकडून काही नुकसान होईल किंवा काही कारणानं त्यांच्याशी मतभेद होतील. धन, खर्च व अपयश यापासून सांभाळून राहावं लागेल.
- कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज आपणास चिंतामुक्त झाल्यानं जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. दांपत्य जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभ व सामाजिक मान - प्रतिष्ठा मिळेल.
- मीन (PISCES) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळं एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्यावं लागेल. कुटुंबीय व प्रियजन यांच्याशी मतभेद संभवतात. विनाकारण खर्च होतील. आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होईल. खाण्या - पिण्यावर संयम ठेवावा लागेल. एकंदरीत आजचा दिवस विचार पूर्वक वागण्याचा आहे.

