12 राशींसाठी कसा राहील श्रावणातील शुक्रवार?; वाचा राशीभविष्य
आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.
राशीभविष्य (File Photo)

Published : August 28, 2026 at 1:11 AM IST
- मेष (ARIES) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्यांकडून लाभ होईल व त्यांचं सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळं मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. प्रवास - पर्यटनाचे बेत यशस्वीपणे आखाल.
- वृषभ (TAURUS) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशम स्थानी असेल. आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूनं लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख - समाधान लाभेल. नवीन कार्याचं आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन व मान- सन्मान प्राप्त होतील. व्यापारी वर्गाला वसुली करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
- मिथुन (GEMINI) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. मानसिकदृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील. शरीराने थकाल व आळसामुळं कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आज नवीन कार्यारंभ न करणं हिताच राहील. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.
- कर्क (CANCER) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टम स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात विघ्ने येतील. कुटुंबात भांडणे होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वास्थ्य राहील.
- सिंह (LEO) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वादापासून दूर राहावं. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही.
- कन्या (VIRGO) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखाच असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
- तूळ (LIBRA) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आपली वैचारिक व मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळं इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा - वादविवाद यात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानानं यश नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आहाराकडं लक्ष द्या. अजीर्णाचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन ह्यात गोडी निर्माण होईल.
- वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. आईची स्वास्थ्य बिघडू शकते. धन व किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्यानं आज झोप सुद्धा होणार नाही.
- धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे. मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. आज आपल्या जीवनात आनंद ओसंडून वाहू लागेल. मित्र व स्नेही भेटल्यामुळं आनंदित व्हाल.
- मकर (CAPRICORN) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्यानं मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकाल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील. शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
- कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र कुंभ राशीत आहे आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणास आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मित्र व कुटुंबीय यांच्यासह आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहल ह्यातून सुद्धा आज आनंद मिळवू शकता. आज विचारातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा.
- मीन (PISCES) : आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. स्थावर संपत्ती व कोर्ट - कचेरीपासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळं सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मिळणार्या फायदयात नुकसान होणार नाही याकडं लक्ष द्यावं लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे निर्णय विचार पूर्वक घ्या. अपघात व गैरसमज यापासून दूरच राहा.

