12 राशींसाठी कसा राहील श्रावणातील गुरूवार?; वाचा राशीभविष्य
आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.
राशीभविष्य (File Photo)

Published : August 27, 2026 at 2:43 AM IST
- मेष (ARIES) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचं वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल. वाहनसौख्य मिळेल. सामाजिक कार्यासाठी प्रवास होतील. रमणीय स्थळाच्या प्रवासाचा आनंद उपभोगू शकाल.
- वृषभ (TAURUS) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज आपण व्यापार वृद्धीवर आपलं लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना व प्रणालीच्या वापरानं व्यापार प्रगतीच्या दिशेनं वाढत जाईल. मात्र कामात यश मिळण्यास विलंब होईल. दुपार नंतर व्यापारातील परिस्थिती अनुकूल होईल. कामानिमित्त प्रवास करावा लागण्याची सुद्धा शक्यता आहे. पदोन्नती होईल. आपल्या कामाच्या पद्धतीमुळं वरिष्ठ आपणावर खुश होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ संभवतात.
- मिथुन (GEMINI) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्यानं वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. दुपारनंतर वैचारिक घोळ निर्माण होईल. मन बेचैन होईल. संततीच्या समस्येमुळं काळजी वाढेल. खर्चाचं प्रमाण वाढणार नाही याकडं लक्ष द्यावं लागेल.
- कर्क (CANCER) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्यानं आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. अकस्मात पैसा खर्च होईल. भागीदारांशी मतभेद वाढतील. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. नवीन कामे सुरू करताना अडचणी येतील.
- सिंह (LEO) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळं लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल. प्रवास होतील. अचानकपणे पैसा खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. नवीन कामात अडथळे येतील.
- कन्या (VIRGO) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.
- तूळ (LIBRA) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह व आनंदाचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी - व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आपल्यातील कलात्मकतेस वाव मिळेल.
- वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्नाचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. परंतु दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. नोकरी - व्यवसायात यशप्राप्ती होणं अवघड होईल. कुटुंबात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. अवेळी खाणं-पिणं होईल. निद्रानाश होण्याची शक्यता आहे. धनहानी संभवते.
- धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडं लक्ष द्यावं लागेल. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनाची जी द्विधा स्थिती झाली होती, त्यात बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. हितशत्रूंवर मात करू शकाल.
- मकर (CAPRICORN) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज आपला कल धार्मिकतेकडं होईल. व्यापार - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. मात्र, दुपार नंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळं निराशा वाढेल. शेअर्स व सट्टयात गुंतवणूक करू शकाल.
- कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपारनंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नतीची शक्यता आहे.
- मीन (PISCES) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपारनंतर मात्र प्रत्येक काम जवाबदारीने करावं लागेल. व्यापार - व्यवसायावर सरकारी हस्तक्षेप वाढेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळाल्यानं नैराश्य येण्याची शक्यता आहे.

