'मेष ते मीन' सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य
आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.
राशीभविष्य (File Photo)

Published : August 26, 2026 at 7:01 AM IST
- मेष (ARIES) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशम भावात असणार आहे. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडं अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीनं काही नवीन मांडणी - सजावट याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल.
- वृषभ (TAURUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. आज परदेशस्थ स्नेहीजनांकडून व मित्रवर्गाकडून आनंददायी बातम्या मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्याना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एखाद्या प्रवासामुळं मनास आनंद होईल. नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढला तरी सुद्धा आर्थिक लाभाची शक्यता आहे.
- मिथुन (GEMINI) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टम भावात असणार आहे. आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणं हिताचं ठरेल. खर्च अधिक झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. त्यामुळं मन सुन्न राहील. आजारी व्यक्तीची नव्यानं तपासणी किंवा शस्त्रक्रिया शक्यतो आज करू नका. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.
- कर्क (CANCER) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आज आपण मौज - मजा व मनोरंजन यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केंन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील.
- सिंह (LEO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळं मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचं वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. वरिष्ठांशी वाद - विवाद टाळा.
- कन्या (VIRGO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळं प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडं आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा यापासून दूर राहणं उचित ठरेल.
- तूळ (LIBRA) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्यानं प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल. जमीन विषयक व्यवहार अतिशय जपून करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.
- वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासानं मनाला आनंद वाटेल. जवळपासचा प्रवास होईल. आरोग्य उत्तम राहील.
- धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्यानं मन हताश होईल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय न घेणे उचित ठरेल. घरी व नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढेल.
- मकर (CAPRICORN) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणानं होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. शारीरिक व मानसिकदृष्टया प्रसन्न राहाल. नोकरी - व्यवसायात पण अनुकूल वातावरण राहील. दांपत्य जीवनात परमानंद लाभेल. घसरणं - पडणं, जखम होणं यांपासून सावध राहा.
- कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे.
- मीन (PISCES) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असणार आहे. आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र - स्नेह्यांशी सुसंवाद साधल्यानं मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संततीकडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. नवीन व महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

