ETV Bharat / spiritual

12 राशींसाठी कसा राहील श्रावणातील गुरूवार?; वाचा राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
आजचं राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 3, 2026 at 1:26 AM IST

4 Min Read
Choose ETV Bharat
  • मेष (ARIES) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्र व कुटुंबीय यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपारनंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आपल्या आहाराकडं लक्ष द्यावं लागेल. आर्थिक देवाण- घेवाणीत सुद्धा सावध राहावं लागेल. मनाच्या उदासीनतेमुळं नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी आईशी आणि नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपारनंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रांकडून लाभ होईल. स्वकीयांशी संपर्क वाढून त्यांच्याशी संबंध सुधारतील. संततीकडून एखादा लाभ संभवतो. नवीन परिचयामुळं मन आनंदित होईल. अचानक धनलाभ संभवतो.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे व सहलीचं नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपारनंतर थोडं सावध राहावं लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र दशम स्थानी असेल. आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्यानं त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल. दुपारनंतर मात्र शारीरिक उत्साह व मानसिक खंबीरता यामुळं थोडाफार आनंद मिळवू शकाल. कुटुंबियांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. घराचं नूतनीकरण करण्यात आपण स्वारस्य दाखवाल व त्यादिशेने काही पाऊल उचलाल.
  • सिंह (LEO) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्यानं इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. कुटुंबियांशी सुद्धा महत्त्वाच्या विषयावर विचार - विनिमय करू शकाल.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टम स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवू शकाल. प्रकृतीच्या कटकटींमुळ हैराण व्हाल, त्यामुळं आपला संताप वाढेल. मात्र , त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या कामावर होणार नाही याकडं लक्ष द्यावं लागेल. आपल्या संतापामुळं कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. एखाद्या धार्मिक समारंभात सहभागी व्हाल.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासानं आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपार नंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शक्यतो प्रवास टाळावेत.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार - व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचं राहील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकाल. वाहनसौख्य लाभेल.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरूवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपारनंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आर्थिक लाभ झाल्यानं भविष्यासाठी काही तरतूद कराल. आपल्या हातून एखादे सत्कार्य घडेल.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावेत.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्यानं आपलं मन दुखावलं जाऊ शकतं. वैचारिक गोंधळामुळं आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणं हिताच राहील.
  • मीन (PISCES) : आज चंद्र मेष राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल.