टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज तुलना वादग्रस्त; इतिहासाच्या मांडणीवरून विधानसभेत खळबळ
कोणी टिपू सुलतान शिवाजी महाराज यांच्या एवढे मोठे राजे होते, असं म्हणत असेल तर त्याला आमचा आक्षेप आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं.


Published : February 26, 2026 at 4:00 PM IST
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करण्यास स्पष्ट आक्षेप नोंदवला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना इतिहासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. "टिपू सुलतान चांगले की वाईट यावर आमचा आक्षेपच नाही. त्यावर चर्चा देखील करू, पण जर कोणी म्हणत असेल की टिपू सुलतान हे शिवाजी महाराज यांच्या एवढे मोठे राजे होते, तर त्याला आमचा आक्षेप आहे. ज्यावेळी असं म्हटलं जातं की, शिवरायांएवढं गुणगाण टिपू सुलतानचं केलं पाहिजे, याला आक्षेप आहे." असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं.
ते पुढे म्हणाले, “इतिहास समजून घेताना संतुलन आवश्यक असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी टिपू सुलतानांच्या कारकिर्दीतील काही वादग्रस्त बाबींवर भाष्य केलं. त्यांच्या मते, त्या काळात धार्मिक तणाव आणि मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या हत्यांचे दावे इतिहासात नमूद आहेत. वर्षानुवर्षे आम्हाला टिपू सुलतान महान राजे होते, असंच शिकवलं गेलं. मात्र त्यांच्या कारकिर्दीत 75 हजार हिंदूंची कत्तल झाल्याचे दावे आहेत, हे सांगितलं गेलं नाही. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, पण तो स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी होता. आता वास्तव इतिहास समोर येत आहे.”असं ते म्हणाले. याचवेळी त्यांनी शालेय अभ्यासक्रमातील मांडणीवरही टीका केली.
‘एनसीईआरटी’ (National Council of Educational Research and Training) च्या पाठ्यपुस्तकांचा संदर्भ देत, पूर्वीच्या सरकारांनी मुघल आणि मराठा इतिहासाच्या मांडणीत भेदभाव केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या दाव्यानुसार, पूर्वी मराठा इतिहासाला अत्यल्प स्थान देण्यात आलं होतं; तर सध्याच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांना 20 पानांचं स्थान देण्यात आलं असून त्यामुळे नव्या पिढीला अधिक सविस्तर माहिती उपलब्ध होत आहे.
दरम्यान, काही गट टिपू सुलतान यांना ब्रिटिशांविरुद्ध लढणारा वीर योद्धा म्हणून गौरवतात, तर टीकाकारांच्या मते इतिहासाचे अध्यापन वैचारिक पूर्वग्रहांपासून मुक्त असावे. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे इतिहासाच्या अर्थलावणीतून निर्माण होणारा राजकीय वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. इतिहासाच्या मांडणीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी सरकारांवर थेट टीका केली. शालेय अभ्यासक्रमात मुघल इतिहासाला अधिक आणि मराठा इतिहासाला कमी स्थान देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “दुर्दैवाने इतिहासात छेडछाड झाली. वर्षानुवर्षे आम्हाला टिपू सुलतान महान होते, असे शिकवले गेले; मात्र त्यांच्या कारकिर्दीतील वादग्रस्त घटनांचा उल्लेख टाळला गेला,” असं ते म्हणाले. टिपू सुलतानांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, परंतु तो स्वतःचे राज्य टिकवण्यासाठी होता, असा दावाही त्यांनी केला.
एनसीईआरटी (National Council of Educational Research and Training ) च्या पाठ्यपुस्तकांचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, “सात दशकांपर्यंत मुघल साम्राज्याला 17 पाने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ एक पान देण्यात आलं. आता मात्र मराठा इतिहासाला 20 पानांचं स्थान देण्यात आलं आहे.” योग्य वेळी संतुलित इतिहास शिकवला असता तर कोणीही औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं नसतं, असा टोला त्यांनी लगावला.
देशातील राष्ट्रभक्त मुस्लीमांविषयी आम्हाला कोणताही आक्षेप नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र देशविरोधी आक्रमकांना नायक म्हणून मांडण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला ठाम विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे इतिहासाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा....

