एकनाथ खडसेंच्या घरवापसीवर मुनगंटीवारांचे मोठं वक्तव्य; 'राम सर्वांचे आहेत' म्हणत उद्धव ठाकरेंबाबतही स्पष्ट भूमिका
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एकनाथ खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चेवर भाष्य केलं. बच्चू कडू, उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांवरही प्रतिक्रिया दिली.

Published : July 13, 2026 at 4:20 PM IST
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भारतीय जनता पार्टी पक्षात घरवापसी होईल अशा चर्चा सुरू आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या संदर्भात बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "भाजपाला वाढवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे, त्यापैकी एकनाथ खडसे एक आहेत. काही अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळं ते पक्षाच्या बाहेर गेले. अमित शाह यांनी भाजपात येण्याबाबत चर्चा केली असेल तर मला माहीत नाही."
बच्चू कडूचे एकनाथ शिंदेवर प्रेम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावा असं बच्चू कडू सातत्यानं मागणी करत आहेत. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, "ते प्रेमापोटी असं बोलतात. संजय राऊत यांनीही बावनकुळे यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. बच्चू कडू यांना वाटलं त्यांनी नाव घेतलं आहे, म्हणून त्यांचा राग करता का."
राम सर्वांचे आहेत : शनिवारी उद्धव ठाकरे नागपुरात राम रक्षा स्रोत्र पठण करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या मंदिराचे सदस्य आहेत, त्याच राम मंदिरात राम रक्षा पठण केलं जाणार आहे. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जीवनच प्रभू राम देतोय. मंदिर कोण्या पक्षाचं नाही. मुख्यमंत्री हे सदस्य असतील तिथे उद्धवजी येऊ नये असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. प्रभू रामाचं नाव उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी घ्यावं. राम सबका है. प्रभूराम फक्त भाजपाचेच आहेत का? प्रभू राम देशाची आस्था आणि अस्मिता आहे, प्राण आहे."
लाडक्या बहिणींसाठी ई केवायसीची मुदत वाढवून द्या : दर दोन-चार महिन्यात लाडक्या बहिणीची नावं वगळली जात आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असल्याचा ठपका ठेवत 92 लाख पेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आली आहेत. यावर मुनगंटीवार म्हणाले की, EKYC ची मुदतवाढ सुचवली आहे.
हेही वाचा -
- 'महाराष्ट्रानं आज सोनेरी हृदयाचा राजकारणी गमावला', सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना
- देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात भाजपाचा एक गट सक्रिय : नाना पटोलेंचा दावा, म्हणाले 'सुधीर मुनगंटीवार . . . '
- महायुतीत एकनाथ शिंदे नाराज? शिंदे अमित शाहांकडे तक्रार करणार नाहीत, ते अजित पवारांशी बोलतील - सुधीर मुनगंटीवार

