ETV Bharat / politics

हिजाबधारी मुस्लिम महिला भारताची पंतप्रधान होणार - खा. असद ओवैसी

हिजाबधारी मुस्लिम महिला भारताची पंतप्रधान होणार असा दावा खा. असद ओवैसी यांनी केलाय. भविष्यात ही गोष्ट होईल असं सांगताना अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 10, 2026 at 7:08 PM IST

|

Updated : January 10, 2026 at 7:29 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सोलापूर : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी शुक्रवारी सोलापूर शहरात प्रचारासाठी आले होते. शुक्रवारची नमाज मी नई जिंदगीत अदा करणार आहे आणि माझ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहे, अशी घोषणा खा. ओवैसी यांनी या अगोदरच केली होती. एमआयएम पक्षाचे 22 उमेदवार सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. एमआयएमचे खा. बॅरिस्टर असद ओवैसी यांनी सोलापूरवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे.

शुक्रवारी खा.ओवैसी यांनी भाषण करताना सांगितलं, भविष्यात भारताच्या पंतप्रधानपदी एक मुस्लिम हिजाबधारी महिला विराजमान होईल. अल्पसंख्याक समाजातील जनतेनं धन संपत्ती कमवण्यापेक्षा आपल्या पाल्यांना जास्त प्रमाणात शिक्षण द्या. विशेषतः मुस्लिम लोकांनी आपल्या मुलींना अधिकचे आणि उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन द्या असं आवाहन त्यांनी केलं. आजची पिढी हे बघायला राहणार नाही, मी सुद्धा राहणार नाही, पण भविष्यात एक मुस्लिम हिजाबधारी महिला भारताची पंतप्रधान होईल असा विश्वास खा. असदुद्दीन ओवैसी यांनी सभेत भाषण करताना व्यक्त केला.

सोलापुरात भाषण करताना खा. ओवैसी (ETV Bharat)

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अनेक मुस्लिम बहुल प्रभागात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांसोबत थेट लढत होत आहे. एमआयएम पक्षाचे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करत आहेत. एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाषण करताना स्पष्ट सांगितलं, राष्ट्रवादीला वोट म्हणजे नरेंद्र मोदी यांना वोट, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाची साथ द्या असं आवाहन ओवैसी यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे काही नेते थेट माझ्यावर टीका करत आहेत, पण माझ्याशी थेट भिडू नका असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी माझ्यासमोर बसून फक्त तीन मिनिटं बोलावं त्यांची बोलती बंद करून पाठवतो असं असद ओवैसी यांनी अजित पवारांसंदर्भात आव्हान दिलं आहे.

इस्राईल देशाचा उल्लेख - एआयएमआयएम पक्षाचे खासदार ओवैसी यांनी भाषण करताना इस्राईल देशाचा उल्लेख केला. इस्राईल आणि पॅलेस्टाइन देशाचे युद्ध सुरू असताना, सोलापुरात इस्राईल देशाचा निषेध करण्यात आला होता. एमआयएमच्या कार्यकर्त्यावर सोलापुरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावर टीका करताना खासदार ओवैसी यांनी इस्राईल देशाची बाजू घेऊन फिर्याद देणारी व्यक्ती ही इस्राईल देशाच्या पंतप्रधान नेतन्याहूचा पुतण्या आहे का. त्याला मी नेतन्याहूचा पुतण्याच म्हणणार अशी टीका असद ओवैसी यांनी केली आहे.

हेही वाचा...

  1. 'मी गेल्यावर मला शहरात दफन करा'-एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचं भावनिक आवाहन
  2. शरद पवारांची राजकीय ताकद कमी झाली, ते आता राज्यसभेत कसं जातील? असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला टोला
Last Updated : January 10, 2026 at 7:29 PM IST