ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा दणका, टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर ठरवला, निर्णयावर ट्रम्प भडकले

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला.

US Supreme Court on donald trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 21, 2026 at 7:15 AM IST

|

Updated : February 21, 2026 at 8:23 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला. सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्या देशांवर लादण्यात येत असलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं आहे.

टॅरिफ बेकायदेशीर - अमेरिकेच्या संविधानानुसार, टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसून तेथील संसदेला मिळालेला आहे. मात्र, ट्रम्प यांनी टॅरिफला एक आर्थिक आणि विदेशी धोरणासाठी ढाल म्हणून वापरलं. ट्रम्प यांनी हे निर्णय अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचं म्हटलं होतं. टॅरिफ शिवाय अमेरिका उद्धवस्त होईल, असं ट्रम्प म्हणाले होते.

ट्रम्प यांचा न्यायालयाच्या निकालावर हल्लाबोल - सुप्रीम कोर्टानं टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "हा निर्णय खूप निराशाजनक आहे." त्यांनी या निर्णयात सहभागी असलेल्या न्यायाधीशांवर हल्ला चढवला आणि म्हटले "आपल्या देशासाठी जे योग्य आहे ते करण्याचं धाडस न्यायालयाच्या काही सदस्यांकडं नसल्याबद्दल मला लाज वाटते."

"मी लाखो मतांनी जिंकलो. पण, हे लोक घृणास्पद, अज्ञानी आणि मोठ्यानं बोलतात. मला वाटतं की, काही न्यायाधीशांना याची भीती वाटते, ते योग्य काम करू इच्छित नाहीत. ते फक्त RINO आणि कट्टरपंथी डाव्या डेमोक्रॅट्ससाठी आहेत, ते फक्त नावानं रिपब्लिकन आहेत. मात्र, ते खूप देशद्रोही आणि आपल्या संविधानाशी विश्वासघातकी आहेत," असा हल्लाबोल डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

अमेरिकेचं संरक्षण करणार - ट्रम्प यांनी घोषणा केली, अमेरिकेचं संरक्षण करण्याच्या प्रयत्नात ते इतर कायद्यांनुसार अधिक शुल्क आकारतील. त्यांनी सांगितलं की, ते १९७४ च्या व्यापार कायद्यानं तयार केलेल्या कलम १२२ अंतर्गत १० टक्के जागतिक शुल्क लादण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात नामांकित केलेल्या सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांनी या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध निकाल दिला. जानेवारीमध्ये झालेल्या एका पोलनुसार, १० पैकी ६ अमेरिकन लोकांनी म्हटलेंआहे की, ट्रम्प इतर देशांवर नवीन शुल्क लादण्यात खूपच पुढे गेले आहेत.

हेही वाचा -

  1. अमेरिकेकडील UFO आणि एलियन्सची माहिती आता जगाला कळणार, संबंधित फाइल्स उघड करण्याचे ट्रम्प यांचे निर्देश
  2. भारत-पाकिस्तान युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, '200 टक्के टॅरिफची धमकी अन् 11 विमानं पाडली'
Last Updated : February 21, 2026 at 8:23 AM IST