ETV Bharat / international

इराणच्या चर्चेच्या ऑफरला डोनाल्ड ट्रम्प यांचं थेट उत्तर; म्हणाले, "खूप उशीर..."

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळं इराण अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे.

Too Late For Iran To Seek Talks
डोनाल्ड ट्रम्प (AP Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 3, 2026 at 9:59 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

वॉशिंग्टन Donald Trump : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळं इराण अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. इराण आता मध्यपूर्वेत अमेरिकेच्या लष्करी तळ असलेल्या देशांवर वारंवार हवाई हल्ले करत आहे. दोन्ही बाजूंकडून सुरु असलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले ट्रम्प : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केली की, "त्यांचं हवाई संरक्षण, हवाई दल, नौदल आणि नेतृत्व संपलं आहे. त्यांना वाटाघाटी करायच्या आहेत. मी म्हणालो खूप उशीर झाला आहे." त्यांचं विधान अशा वेळी आलं आहे जेव्हा इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "इराण चर्चेसाठी तयार आहे, पण सन्मानानं." यापूर्वी, इराणवरील हल्ल्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की इराण अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे विकसित करत आहे.

47 वर्षांपासून इराण करतोय हल्ला : दरम्यान मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की इराणविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई सुरु आहे. "या दहशतवादी सरकारनं अमेरिकेला गंभीर धोका निर्माण केला आहे. इराण अण्वस्त्रांच्या शोधावर ठाम होता, यामुळं, अमेरिका पूर्ण सतर्क होती," असं ट्रंप म्हणाले. त्यांनी सांगितलं की, "त्यांच्याकडे अमेरिकेला मारण्यास सक्षम क्षेपणास्त्रे आहेत. पण मी ते होऊ देणार नाही. हे इराणी सरकार गेल्या 47 वर्षांपासून अमेरिकनांवर हल्ला करत आहे. या दुष्ट सरकारवर हल्ला करण्याची ही आमची शेवटची संधी होती."

Too Late For Iran To Seek Talks
डोनाल्ड ट्रम्प (AP Photo)

गरज पडल्यास सैन्य तैनात करु : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की, "आम्ही इराणला वारंवार इशारा दिला आहे, परंतु त्यांनी ऐकलं नाही. गरज पडल्यास, आम्ही सैन्य तैनात करु. इराण सरकार मध्य पूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यासाठी धोका बनली आहे. इराण आपला पारंपारिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम वेगानं वाढवत आहे." तसंच ट्रम्प यांनी इशारा दिला की, इराणकडे आधीच युरोप आणि परदेशातील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यास सक्षम क्षेपणास्त्रे आहेत. त्यांनी सांगितलं की, "इराण लवकरच थेट अमेरिकेवर पोहोचू शकणारे क्षेपणास्त्र विकसित करेल."

हेही वाचा :

  1. कतारएनर्जीनं LNG प्रोडक्शन थांबवले; टँकरमधील व्यत्यय आणि सुविधा बंद पडल्यामुळं पुरवठ्यात अडथळा, एनर्जीच्या किमती वाढल्या
  2. पंतप्रधान मोदी यांनी नेतन्याहू आणि यूएईच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवरून साधला संवाद, भारतीयांच्या सुरक्षेवर दिला भर
  3. अयातुल्ला अराफी कोण आहेत? खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या 'सर्वोच्च नेते'पदी झाली निवड