ETV Bharat / international

इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात लेबेनॉनमध्ये 182 लोक ठार; युद्धविरामाला पहिल्याच दिवशी सुरुंग

इस्रायलनं लेबनॉनमध्ये हल्ला केल्यानं युद्धविरामाला पहिल्याच दिवशी सुरुंग लागला आहे. इराणनं प्रत्युत्तर म्हणून पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत सागरी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली.

US IRAN war
ईरानच्या युद्धाच्या विरोधामध्ये7 एप्रिल, 2026 रोजी वाशिंगटनमध्ये व्हाईट हाऊसच्या लाफायट पार्कच्या बाहेर जमलेले लोक (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 9, 2026 at 8:06 AM IST

|

Updated : April 9, 2026 at 8:53 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तर म्हणून इराणनं पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. त्यामुळे इराणमधील युद्ध थांबवण्याचा युद्धविराम धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान 182 लोक ठार झाले होते.

अमेरिकेनं 14 दिवसांसाठी युद्धविराम घोषित केल्यानंतर इराणनं होर्मुझ खुला करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. दुसरीकडं अमेरिका आणि इराणनं युद्धामधील उद्दिष्टे पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र, इस्रायलनं लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी गटावरील हल्ले तीव्र केले. बेरूतच्या अनेक व्यावसायिक आणि निवासी भागांवर पूर्वसूचना न देता हल्ले केले. या हिंसाचारामुळे युद्धविरामाच्या कराराला सुरुंग लागण्याचा धोका निर्माण झाल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी म्हटलं आहे.

इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे की, शत्रुत्व कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने अमेरिकेसोबत नियोजित असलेल्या चर्चा अतार्किक आहेत. कारण, युद्धाचा शेवट करण्यासाठी तेहराननं घातलेल्या 10 अटींपैकी तीन अटींचे वॉशिंग्टननं उल्लंघन केलं आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, मोहम्मद बागेर घालीबाफ यांनी हिजबोल्लावर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांवर युद्धविराम लागू झाल्यानंतरही इराणच्या हवाई हद्दीत कथितरित्या ड्रोननं केलेल्या घुसखोरीवर आणि अंतिम करारात इराणच्या अणुसमृद्धी क्षमतेचा कोणताही स्वीकार केला जाणार नाही, या अमेरिकेच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे.

लेबनॉनवरून वाद- इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आग्रह धरला की, लेबनॉनमधील युद्ध समाप्त करणं, हा अमेरिकेसोबतच्या युद्धविराम कराराचा एक भाग होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, या युद्धविरामात लेबनॉनचा समावेश नाही. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणालं की, अमेरिकन आणि इस्रायलच्या सैन्यानं एक 'मोठा लष्करी विजय' मिळवला आहे. इराणी सैन्य आता अमेरिकन सैन्यासाठी किंवा या प्रदेशासाठी कोणताही मोठा धोका निर्माण करत नाही.

  • विंडवर्ड या सागरी गुप्तचर संस्थेनुसार, बुधवारी सामुद्रधुनीतून केवळ 11 जहाजे गेली आहेत. इराण तेल वाहतूकदारांकडून बाहेर जाणाऱ्या तेलासाठी प्रति बॅरल 1 डॉलरपर्यंत टोल आकारत होता, असेही त्यात म्हटलं आहे. सर्वात मोठे सुपरटँकर 30 लाख बॅरलपर्यंत कच्चे तेल वाहून नेतात. इराणच्या क्षेपणास्त्र आणि अणु कार्यक्रमांचे भवितव्यही अस्पष्ट राहिले.
Last Updated : April 9, 2026 at 8:53 AM IST