स्वित्झर्लंडवर दु:खाचं सावट; नववर्षाचं स्वागत करताना बारमधील आगीत ४० नागरिकांचा मृत्यू
स्वित्झर्लंडमधील बारमध्ये गुरुवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत किमान ४० नागरिकांचा मृत्यू झाला. तर ११५ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

By ANI
Published : January 2, 2026 at 7:06 AM IST
|Updated : January 2, 2026 at 7:33 AM IST
बर्न- स्वित्झर्लंडमध्ये नववर्ष स्वागत करण्यासाठी बारमध्ये आलेल्या नागरिकांना हकनाक जीवाला मुकावे लागले. त्यामुळे स्वित्झर्लंडवर नववर्षाच्या सुरुवातीलाच दु:खाचं सावट निर्माण झालं आहे.
स्वित्झर्लंडमधील क्रान्स-माँटाना येथील स्की रिसॉर्टमधील 'ले कॉन्स्टेलेशन' बारमध्ये लागलेल्या आगीत किमान ४० नागरिकांचा मृत्यू झाला. तर सुमारे ११५ जण जखमी झाले आहेत, असे वालिस कँटोनल पोलिसांनी सांगितल्याचं एका माध्यमानं वृत्त दिलं. क्रान्स-माँटाना येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वालिस कँटोनल पोलीस कमांडर फ्रेडरिक गिसलर यांनी आगीच्या दुर्घटेनची माहिती दिली. बारमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
काही मिनिटातच आपत्कालीन पथक घटनास्थळी- वालिस कँटोनल पोलीस कमांडर फ्रेडरिक गिसलर यांच्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे सुमारे १:३० वाजता स्विस स्की रिसॉर्टच्या मध्यभागी असलेल्या बारमधून प्रथम धूर निघताना दिसला. काही क्षणांनंतर एका प्रत्यक्षदर्शीनं आपत्कालीन कॉल सेंटरशी संपर्क साधून आगीच्या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या सेवा कार्यान्वित करण्यासाठी पोलिसांकडून तातडीनं रेड अलर्ट जारी करण्यात आला. क्रान्स-माँटानाचे पोलीस आणि जेंडरमेरीची पहिली पथके पहाटे १:३२ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेड अलर्टनुसार अतिरिक्त आपत्कालीन प्रतिसाद देणारे कर्मचारीही त्यांच्यासोबत बचाव मोहिमेत सामील झाले.
What was a moment of joy turned into a tragedy in Crans-Montana last night, felt across the country and beyond. The Federal Council has taken note of this with deep dismay. Its thoughts are with the victims, the injured and their families and it extends its deepest condolences.
— Guy Parmelin (@ParmelinG) January 1, 2026
पहाटे सुरू करण्यात आली हेल्पलाईन- पीडितांना वाचविणं आणि त्यांना आपत्कालीन मदत पुरवणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट होते. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश मिळवले. त्यानंतर प्राथमिक तपास सुरू करण्यात आला. मदत केंद्रे सुरू करण्यात पीडितांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आणि कुटुंबीयांना माहिती आणि मदत करण्यासाठी पहाटे ४:१४ वाजता एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली.
ओळख पटविल्यानंतर ताब्यात देण्यात येणार मृतदेह- पहाटे ५ वाजण्याच्या काही वेळातच सर्व जखमींवर उपचार करण्यात आले होते. ओळख पटल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे लवकर परत केले जातील, असे गिसलर यांनी सांगितलं. ४० पीडितांची ओळख पटवण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेबद्दल पीडितांच्या कुटुंबीयांप्रति आणि स्विस सरकारबद्दल दु:ख व्यक्त केलं.
हेही वाचा-

