ETV Bharat / international

कृष्ण चेतना जगाला अधिक चांगलं बनू शकते - मोहन भागवत

मोहन भागवत यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान शुक्रवारी (28 ऑगस्ट) न्यूयॉर्कमधील इस्कॉन मंदिराला भेट दिली.

Mohan Bhagwat New York Event: RSS Chief To Address Over 5,000 People In Madison Square Garden Today
कृष्ण चेतना जगाला अधिक चांगलं बनू शकते - मोहन भागवत (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 29, 2026 at 8:29 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान शुक्रवारी (28 ऑगस्ट) न्यूयॉर्कमधील इस्कॉन मंदिराला भेट दिली. तसंच बेघरांना अन्नवाटप करण्याच्या उपक्रमात भाग घेतला. यावेळी कृष्णभावनेमुळं जगातील संघर्ष आणि मतभेद दूर होण्यास मदत होऊ शकते, यावर मोहन भागवत यांनी जोर दिला.

चेतना म्हणजे 'कृष्ण-चेतना' : मंदिरात भक्तांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी मतभेद आणि संघर्ष असूनही लोकांना एकत्र आणण्यात चेतनेच्या महत्त्वाविषयी सांगितलं. मोहन भागवत म्हणाले की, "आजच्या जगात खूप संघर्ष आहे, खूप द्वैतभाव आहे. लोकांना एकत्र आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे चेतना. ती चेतना म्हणजे 'कृष्ण-चेतना' आहे. आपण एक आहोत आणि या जगाच्या द्वैतांमध्ये असूनही, आपण या दृढ समजुतीनं ती जगतो की, जरी इथं अनेक विविधता, संघर्ष आणि कलह असले तरी, हे सर्व कृष्णच आहे."

'युनिव्हर्सल वननेस' कार्यक्रमाला संबोधित करणार : पुढं मोहन भागवत म्हणाले की, "सर्व काही कृष्ण आहे आणि जर ते जग प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचलं, तर ते आज आपण पाहत असलेल्या जगापेक्षा एक चांगले जग असेल. ते प्रत्येक मानवासाठी एक स्वर्ग असेल." दरम्यान, मोहन भागवत शनिवारी न्यूयॉर्कमधील 'मॅडिसन स्क्वेअर गार्डन' इथं 'युनिव्हर्सल वननेस' कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमास अमेरिकेतील 39 राज्यांतून पाच हजारहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

मोहन भागवत तीन देशांच्या दौऱ्यावर : दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडम या तीन देशांच्या दौऱ्याचा भाग म्हणून गेल्या मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. या आगामी कार्यक्रमावर न्यूयॉर्कमध्ये टीका होत आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी म्हणाले की, ते आरएसएसच्या कार्यक्रमाला पाठिंबा देत नाहीत, परंतु एका खाजगी बैठकीला रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाला आहे की नाही, याबद्दल आपल्याला खात्री नसल्याचं त्यांनी कबूल केलं.

हेही वाचा :

  1. PM नरेंद्र मोदी 4 दिवसीय परदेश दौऱ्यासाठी रवाना; म्हणाले, "दहशतवादमुक्त प्रदेशाचं स्वप्न साकार करणं, हे आमचं ध्येय"
  2. नेपाळ पूर अपडेट : अखेर महाराष्ट्रातील भाविकांचा परतीचा प्रवास सुरू; दोन विशेष रेल्वे बोगींची व्यवस्था
  3. मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेनंतर व्यासपीठाचं शुद्धीकरण; राहुल गांधी आक्रमक, भाजपा-आरएसएसवर साधला निशाणा