ETV Bharat / international

बांगलादेशात हिंदूंच्या हत्या सुरूच, दुकानात बसलेली व्यक्ती अन् पत्रकाराचा खून

मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांना बर्फाच्या कारखान्यातून बाहेर काढले आणि एका गल्लीत नेले, तिथे जवळून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि पळून गेले.

Killings of Hindus continue in Bangladesh
बांगलादेशात हिंदूंच्या हत्या सुरूच (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 6, 2026 at 12:04 PM IST

|

Updated : January 6, 2026 at 12:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ढाका : भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशमधील परिस्थिती सामान्य होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दररोज नवीन घटना घडत आहेत आणि अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य केलं जातंय. बांगलादेशात एका पत्रकाराची हत्या करण्यात आलीय. बांग्ला भाषेतील दैनिक प्रथम आलोने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित व्यक्तीचं नाव राणा प्रताप बैरागी (38) असे असून, ते खुलना विभागातील जेसोरच्या केशबपूर उपजिल्ह्यामधील अरुआ गावचा रहिवासी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणा प्रताप यांचा मोनिरामपूरच्या कपालिया बाजार येथे एक बर्फाचा कारखाना होता आणि ते नरैल आधारित वृत्तपत्र "दैनिक बीडी खोबोर"चे संपादक होते. मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांना बर्फाच्या कारखान्यातून बाहेर काढले आणि एका गल्लीत नेले, तिथे जवळून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि पळून गेले. राणा प्रताप यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी जेसोरमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीच्या हत्येच्या बातमीनंतर ही हत्या करण्यात आलीय.

शरत चक्रवर्ती मणी या 40 वर्षीय हिंदूची धारदार शस्त्रांनी हत्या : मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानी ढाकाजवळील नरसिंगडी येथे सोमवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी शरत चक्रवर्ती मणी या 40 वर्षीय हिंदूची धारदार शस्त्रांनी हत्या केली. एका स्थानिक वृत्तपत्राने या वृत्ताला दुजोरा दिलाय. स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींनी दावा केलाय की, मणी पलाश उपजिल्ह्यातील चारसिंदूर बाजार येथील त्यांच्या किराणा दुकानात होते. हल्लेखोर अचानक आले आणि त्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि तेथून पळून गेले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांना गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. गेल्या 18 दिवसांत बांगलादेशमध्ये हिंदू व्यक्तीची ही सहावी हत्या आहे. 19 डिसेंबरला मणी यांनी देशातील हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करणारी एक सोशल मीडिया पोस्ट पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांचे जन्मस्थान म्हणजे "मृत्यूची दरी" असे वर्णन केले होते. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांनी हत्येचा हेतू उघड केलेला नाही : मोनिरामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (ओसी) एमडी राजिउल्लाह खान यांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय आणि तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात येतोय. पोलिसांनी हत्येचा हेतू उघड केलेला नाही आणि तपास सुरू आहे. अलिकडच्या आठवड्यात अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले आणि वाढत्या असुरक्षिततेच्या बातम्या आल्यात. अलिकडच्याच एका दुःखद घटनेने विशेषतः नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खोकन दास या हिंदू पुरुषाला जाळून टाकण्यात आलंय, ज्यामुळे त्याचा मृत्यू झालाय.

दास यांनी रस्त्याजवळील एका तलावात उडी मारली : हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केलाय, त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिलंय. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात दास यांनी रस्त्याजवळील एका तलावात उडी मारली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावले आणि हल्लेखोरांना पळवून लावले. जवळच्या रहिवाशांनी दास यांना वाचवले आणि शरीयतपूर सदर रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांच्यावरील गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला.

Last Updated : January 6, 2026 at 12:21 PM IST