ETV Bharat / international

इराण इस्रायलच्या युद्धाचा भडका : शाळेवरील हल्ल्यात अनेक विद्यार्थिनींचा मृत्यू, अयातुल्ला खामेनेई करणार राष्ट्राला संबोधित

अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

People watch as smoke rises on the skyline after an explosion in Tehran, Iran, Saturday,
शनिवारी इराणच्या तेहरानमध्ये झालेल्या स्फोटानंतर आकाशातील धूराचे लोट पाहताना नागिरक (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 1, 2026 at 1:21 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

Iran Israel War Update : अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे इराणवर हल्ले केल्यानं जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढला. इराणनं इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांवर क्षेपणास्त्रं डागून या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे जिथं अमेरिकन तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ले करण्यात आले. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात दक्षिण इराणमधील मिनाब जिल्ह्यातील शाळेच्या अनेक विद्यार्थथिनींचा मृत्यू झाला आहे. इराणमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तब्बल 85 विद्यार्थिनींचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई हे राष्ट्राला संबोधित करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिनाबमधील हल्ल्यात 85 विद्यार्थिनींचा मृत्यू : दक्षिण इराणमधील मिनाब परिसरात असलेल्या गावातील शाळेवर अमेरिका आणि इस्ररायलनं संयुक्त हल्ला केला. या हल्ल्यात 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या शाळेची इमारत जमीनदोस्त झाली आहे. हल्ला झाल्यानंतर अनेक विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर अनेक जण या हल्ल्यात गंभीर झाले आहेत.

इराणमध्ये मोठ्या लढाऊ कारवाया : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "अमेरिकन सैन्यानं इराणमध्ये मोठ्या लढाऊ कारवाया सुरू केल्या आहेत, त्याचा उद्देश इराणी राजवटीकडून येणाऱ्या धोक्यांना दूर करून" अमेरिकेचं रक्षण करणं आहे. त्यांनी या लष्करी मोहिमेचे वर्णन "मोठ्या आणि चालू" असं केलं. त्यामुळे अमेरिकन नागरिकांचे जीव जाऊ शकतात, असं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये ट्रम्प यांनी दावा केला की, "इराणनं आपला अणुकार्यक्रम विकसित करणं सुरू ठेवलं आहे. अमेरिकेपर्यंत पोहोचण्यासाठी क्षेपणास्त्रे विकसित करण्याची योजना आखली आहे. इराणी लोकांना "तुमचं सरकार ताब्यात घ्या - ते तुम्हालाच घ्यायचे आहे" असे आवाहन केले.

अमेरिकेनं इराणच्या अणुकार्यक्रमावर करार करण्यास दबाव आणण्यासाठी लढाऊ विमानं आणि युद्धनौकांचा एक मोठा ताफा जमवला आहे. इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी हा हल्ला "धोके दूर करण्यासाठी" केल्याचे वर्णन केलं. त्यांनी लगेच तपशीलवार माहिती दिली नाही, परंतु इस्रायली सार्वजनिक प्रसारकानं हे वृत्त दिले आहे की हे हल्ले इराणमधील "शासन आणि लष्करी स्थळांना लक्ष्य करत आहेत ज्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे".

असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, पहिला हल्ला सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या कार्यालयाजवळ झाला. तेव्हा तेहरानच्या मध्यभागी धुराचे लोट उठताना दिसत होते. वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, "तेहरानच्या केशवरदूत आणि पाश्चर जिल्ह्यात सात क्षेपणास्त्रांचे स्फोट जाणवला आहे. जिथे खामेनी यांचे निवासस्थान आहे. ८६ वर्षीय खामेनी त्यावेळी त्यांच्या कार्यालयात होते की त्यांच्या निवासस्थानावर हे लगेच स्पष्ट झालं नाही. राजधानीत इतर स्फोटांमुळे तेहरानच्या मध्यभागी असलेल्या खामेनींच्या कंपाऊंडकडं जाणारं रस्ते अधिकाऱ्यांनी बंद केले.

हेही वाचा :

  1. अँथ्रोपिक एआय तंत्रज्ञानाचा वापर 'तत्काळ' थांबवा; डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन सरकारला आदेश
  2. इस्रायलचा इराणवर हल्ला, इराणमध्ये आणीबाणी लागू, इस्रायलनेही केली राजधानी तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द