ETV Bharat / international

मूळ भारतीय वंशाचे पुलकित देसाई यांनी जिंकली निवडणूक; पार्सिपनीच्या महापौर पदाची घेतली शपथ

डेमोक्रॅट पक्षाचे पुलकित देसाई यांनी पार्सिपनी महापौर पदाची निवडणूक जिंकली. तसेच डेमोक्रॅट पक्षाने दोन नगरपरिषद जागा जिंकून टाउनशिप परिषदेवर नियंत्रण मिळवलं.

Indian American Pulkit Desai
पुलकित देसाई (IANS)
author img

By IANS

Published : January 5, 2026 at 11:38 AM IST

|

Updated : January 5, 2026 at 11:46 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

वॉशिंग्टन- मूळ भारतीय वंशाचे, अमेरिकन नौदलाचे माजी सैनिक आणि तंत्रज्ञान व्यावसायिक असलेले पुलकित देसाई यांनी न्यू जर्सीमधील पार्सिपनी शहराचे महापौर म्हणून शपथ घेतली. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत विजय मिळवून ते या शहराचे पहिले भारतीय वंशाचे -अमेरिकन महापौर बनले आहेत.

पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या मुलाखतीत देसाई यांनी सांगितलं की, त्यांचे प्रशासन स्थानिक सेवा मजबूत करण्यासोबतच विकास करण्याकरिता लक्ष केंद्रित करणार आहे. पार्सिपॅनीचा विकास सुयोग्य पद्धतीनं होईल याची खात्री करण्याला आमचं मुख्य प्राधान्य असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, यावर भर असणार आहे. मी जे काही करेन, त्याबद्दल पार्सिपनीच्या लोकांशी प्रामाणिक राहून करेन. निर्णय कसे घेतले जातात, हे रहिवाशांना कळलं पाहिजे. टाउनशिपच्या प्रशासनात काहीही लपवलेले नसावे. पार्सिपनीमध्ये भारतीय-अमेरिकन लोकसंख्या मोठी आहे. स्वतःला टाउनशिपमधील भारतीय-अमेरिकन लोकांचा प्रतिनिधी मानतो, असंही त्यांनी सांगितलं. कौन्सिल सदस्य दिया पटेल यांनीदेखील पार्सिपनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे.

  • देसाई यांनी महापौर पदापर्यंतच्या आपल्या प्रवासाची माहिती दिली. ते म्हणाले, "मी खूप लहान वयात येथे आलो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेच्या मरीन कॉर्प्समध्ये सेवा रुजू झालो. डेझर्ट स्टॉर्मच्या कालावधीसह सहा वर्षे सेवा केली. त्यानंतर तीन दशके तंत्रज्ञान क्षेत्रात काम केले, मेनफ्रेम सिस्टीमपासून सायबर सुरक्षेचं काम केलं."

स्थानिक राजकारणात कसा प्रवेश केला, याची त्यांनी माहिती देताना सांगितलं की, पूर्वी रहिवाशांना मतदान करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावं लागत होतं. फक्त मतदान करण्यासाठी कोणालाही अतिरिक्त पैसे द्यावे लागू नयेत, अशी भूमिका होती. अतिरिक्त शुल्क हे 'मतदान कर' म्हणून द्यावे लागत होते. या संघर्षामुळे राजकारणात प्रवेश करून आपण अखेरीस महापौरपदापर्यंत पोहोचलो, असं त्यांनी सांगितलं.

  • पार्सिपनी हे मॉरिस काउंटीमधील सर्वात मोठे टाउनशिप आहे. अलीकडच्या वर्षांत आशियाई-अमेरिकन समुदायाचं प्रमाण वाढल्यानं लोकसंख्येच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत.
  • उल्लेखनीय बाब म्हणजे नुकतेच मूळ भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले भारतीय वंशाचे महापौर आहेत.

हेही वाचा-

Last Updated : January 5, 2026 at 11:46 AM IST