ETV Bharat / international

अफगाणिस्तानात मुसळधार पावसाचा कहर, अचानक आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झालंय, असंही अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ हम्मद यांनी गुरुवारी सांगितलंय.

Heavy rains have wreaked havoc in Afghanistan
अफगाणिस्तानात मुसळधार पावसाचा कहर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 10:01 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

काबूल- हंगामातील पहिल्या मुसळधार पाऊस अन् हिमवृष्टीने अफगाणिस्तानातील दीर्घकाळापासून सुरू असलेला दुष्काळ मोडीत काढलाय, परंतु अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पुरात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून, 11 जण जखमी झालेत. मुसळधार पावसामुळे मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झालंय, असंही अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ हम्मद यांनी गुरुवारी सांगितलंय.

हजारो कुटुंबे प्रभावित, पायाभूत सुविधांचे नुकसान : हम्मद यांच्या मते, पुरामुळे रस्ते, घरे आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झालंय. या आपत्तीमुळे सुमारे 1800 कुटुंबे प्रभावित झालीत, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील कठीण परिस्थिती आणखी बिकट झालीय. हेरात प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ सईदी यांच्या मते, हेरात प्रांतातील काबाकान जिल्ह्यात घराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे.

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू : अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ हम्मद यांच्या मते, सोमवारपासून बहुतेक मृत्यू पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये झालेत आणि तीव्र हवामानामुळे मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागातही जनजीवन विस्कळीत झालंय. हम्मद म्हणाले की, पुरामुळे प्रभावित जिल्ह्यांमधील पायाभूत सुविधांचंही मोठं नुकसान झालंय, अनेक पशू-पक्षी मृत्युमुखी पडलेत आणि 1800 कुटुंबांना त्याचा फटका बसलाय, ज्यामुळे आधीच असुरक्षित शहरी आणि ग्रामीण समुदायांमध्ये परिस्थिती आणखी बिकट झालीय.

पुढील गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू : हम्मद म्हणाले की, एजन्सीने सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात मूल्यांकन पथके पाठवली आहेत आणि पुढील गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. शेजारील पाकिस्तान आणि भारताप्रमाणे अफगाणिस्तानदेखील अत्यंत हवामानविषयक घटनांना विशेषतः हंगामी पावसानंतर येणाऱ्या अचानक आलेल्या पुरांना बळी पडण्यास अत्यंत असुरक्षित आहे. दशकांपासून सुरू असलेला संघर्ष, खराब पायाभूत सुविधा, जंगलतोड आणि हवामान बदलाचे वाढते परिणाम यामुळे अशा आपत्तींचा परिणाम वाढलाय. संयुक्त राष्ट्र आणि इतर मदत संस्थांनी या आठवड्यात इशारा दिला होता की, 2026 पर्यंत अफगाणिस्तान जगातील सर्वात मोठ्या मानवतावादी संकटांपैकी एक राहील. संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या मानवतावादी भागीदारांनी मंगळवारी देशातील जवळजवळ 18 दशलक्ष गरजू लोकांना मदत करण्यासाठी 1.7 अब्ज डॉलर्सच्या मदतीचे आवाहन केलंय.