ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दणका! टॅरिफ 15 टक्क्यांपर्यंत वाढवला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक कर 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

Donald Trump Raises tariff
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (AFP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 22, 2026 at 7:01 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे अनेक देशांवरील कर 10 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक कर 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. हे पाऊल कायदेशीरदृष्ट्या योग्य असून अमेरिकन हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असल्याचे वर्णन करत त्यांनी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील देशांना आता मोठा फटका बसणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत ही घोषणा केली. त्यांनी माहिती दिली, हा नवीन कर तत्काळ लागू होणार आहे. अमेरिकन सरकार पुढील काही महिन्यांत नवीन, कायदेशीररित्या वैध असलेले टॅरिफ लादणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अनेक देशांनी अनेक दशकांपासून अमेरिकेचा फायदा घेतला आहे, त्यांच्यावरील कर वाढवणे गरजेचे आहे असं ट्रम्प यांनी म्हटले आहे.