ETV Bharat / international

भारत-पाकिस्तान युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, '200 टक्के टॅरिफची धमकी अन् 11 विमानं पाडली'

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धावर मोठं विधान केलं आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 20, 2026 at 10:50 AM IST

|

Updated : February 20, 2026 at 11:40 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

वॉशिंग्टन - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करत अनेक दहशतवाद्यांना ठार मारलं होतं. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. त्यावरुन ते जोरदार ट्रोलही झाले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा मोठा दावा केला. त्यांनी दावा केला की, जर दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी देशांनी युद्ध थांबवलं नाही तर त्यांच्यावर २०० टक्के कर लादण्याची धमकी त्यांनी दिली होती. बोर्ड ऑफ पीस कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी आणखी एक दावा केला की, युद्धादरम्यान ११ जेट विमानं पाडण्यात आली होती.

गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या युद्ध संघर्षादरम्यान कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाचं किंवा विमानांचं नुकसान झाल्याचे सर्व दावे भारताने सातत्याने नाकारले आहेत.

काय घडलं नेमकं? - डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील एकाकार्यक्रमाला इतर देशांच्या नेत्यांसह पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ देखील उपस्थित होते. कार्यक्रमाला संबोधित करताना ट्रम्प यांनी त्यांनी संपवलेल्या संघर्षांची (युद्ध) यादी केली आणि संबंधित राष्ट्रांचा उल्लेख करताना त्या त्या देशांच्या नेत्यांना उभं राहण्यास सांगितलं. ट्रम्प यांनी शरीफ यांना देखील उभं राहण्यास सांगितलं.

व्यापारी करार बंद करण्याची दिली धमकी - "मी दोघांशी फोनवर बोललो. मी शरीफ यांना थोडंफार ओळखत होतो. खरंतर, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूप चांगलं ओळखत होतो," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. "जेव्हा मी ऐकलं की दोन देश भांडत (युद्धजन्य) आहेत, तेव्हा मी एक विशिष्ट वर्तमानपत्र उचललं. त्यात पाहिलं की पाकिस्तान आणि भारत खरोखरच युद्ध करत होते. मग परिस्थिती आणखी बिकट होत गेली आणि अनेक विमानं पाडण्यात आली. त्यानंतर मी त्यांना (दोन्ही देशांचे प्रमुख) फोन केला, मी म्हणालो, ऐका, जर तुम्ही हे मिटवलं नाही तर मी तुमच्या दोघांबरोबर व्यापारी करार करणार नाही. दोन्ही देशांपैकी कोणीही ते करू इच्छित नव्हतं," असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

हेही वाचा -

  1. 'मोदी सरकारवर ट्रम्प सरकारचा दबाव आहे का?'- राफेल खरेदीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारला प्रश्न!
  2. भारताचे निर्णय ट्रम्प घेणार का? मोदी सरकारनं देश विकला का? लोकसभेत राहुल गांधी यांचा घाणाघात!
Last Updated : February 20, 2026 at 11:40 AM IST