ETV Bharat / international

बँकेतील नोटा घेवून जाणारं विमान कोसळलं, 15 जणांचा मृत्यू

पैसे घेऊन जाणारं एक मालवाहू विमान कोसळलं. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

plane crash
बँकेतील नोटा घेवून जाणारं विमान कोसळलं (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 28, 2026 at 8:11 AM IST

|

Updated : February 28, 2026 at 8:32 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बोलिव्हिया - बोलिव्हियाच्या राजधानीजवळ शुक्रवारी पैसे घेऊन जाणारं एक मालवाहू विमान कोसळलं. महामार्गावरील सुमारे 12 वाहनांचं नुकसान झालं. विमान कोसळल्यानंतर नोटा जमिनीवर विखुरल्या गेल्या होत्या. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. यात अनेकजण जखमी झाले आहेत.

पंधरा जणांचा मृत्यू - रॉयटर्सच्या वृत्तानुसार, "शुक्रवारी संध्याकाळी बोलिव्हियाची राजधानी ला पाझजवळील एल अल्टो शहरात खराब हवामानामुळं एक विमान कोसळलं. देशाच्या मध्यवर्ती बँकेतून नवीन नोटा घेऊन जाणारं बोलिव्हियन एअर फोर्स हर्क्युलस विमान एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळल्याने पंधरा जणांचा मृत्यू झाला. यात किमान 30 जण जखमी झाले."

नोटा घेवून जात होतं विमान - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, विमानानं ला पाझला लागून असलेल्या एल अल्टो शहरात वाहनांना धडक दिली आणि नंतर ते एका शेतात कोसळलं. विमान कोसळलं तेव्हा ते उड्डाण करत होतं की लँडिंग करत होतं याबद्दल परस्परविरोधी वृत्त आहे.

कोसळल्यानंतर विमानाला लागली आग - विमानातील सामान, गाड्यांचा झालेला चुराडा आणि मृतदेह रस्त्यावर पडले होते. किमान 12 वाहनं या विमानाखाली दबली गेली. विमानाला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. बोलिव्हियन हवाई दलाचं हे विमान सेंट्रल बँकेतून इतर शहरांमध्ये नवीन नोटा घेऊन जात होतं. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात नोटा जमिनीवर विखुरलेल्या होत्या.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी नोटांचा खच साचला होता. या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, घटनास्थळी पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात केली आहे.

अधिकाऱ्यांनी टर्मिनलवर येणारी आणि येणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली.

हेही वाचा -

  1. एअर अ‍ॅम्ब्युलन्स विमान कोसळलं, सात जणांचा मृत्यू; रुग्णाला घेवून दिल्लीला निघालं होतं विमान
  2. उपचाराकरिता 8 लाखांचे कर्ज काढून एअर रुग्णवाहिका केली होती बुक; दुर्घटनेत रुग्णासह सात जणांचा मृत्यू
Last Updated : February 28, 2026 at 8:32 AM IST