स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करताना बारमध्ये स्फोट; काही जणांचा मृत्यू
स्वित्झर्लंडमधील एका बारमध्ये पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. बारमधील मृतांची संख्या अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही.

Published : January 1, 2026 at 12:30 PM IST
|Updated : January 1, 2026 at 7:04 PM IST
जिनिव्हा: जगभरात नवीन वर्षाचं स्वागत सुरू असताना स्वित्झर्लंडमधील दु:खद घटना घडली आहे. क्रान्स मॉन्टाना या आलिशान आल्पाइन स्की रिसॉर्ट शहरात एका बारमध्ये झालेल्या स्फोटात काहीजण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत, अशी स्विस पोलिसांनी गुरुवारी पहाटे माहिती दिली. स्फोटाचं नेमकं कारण समोर आलं नाही.
दक्षिण-पश्चिम स्वित्झर्लंडमधील वालिस कँटनचे पोलीस प्रवक्ते गाएतान लॅथिऑन यांनी अज्ञात कारणामुळे स्फोट झाल्याचं सांगितलं. हा स्फोट पहाटे १:३० च्या सुमारास (००३० जीएमटी) 'ले कॉन्स्टेलेशन' नावाच्या बारमध्ये झाला. हा बार पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. बारमध्ये अनेक लोक नवीन वर्षाचे स्वागत करत होते. बचावकार्य अजूनही सुरू आहे, अशी त्यांनी माहिती दिली. स्विस माध्यमांनी प्रकाशित केलेल्या छायाचित्रांमध्ये एक इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली. जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन सेवा पोहोचल्या होत्या.
दक्षिण स्वित्झर्लंडमधील व्हॅलाइस कॅन्टनमधील पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या बारमध्ये आग लागली. क्रॅन्स-मोंटाना वेबसाइटनुसार, पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, ले कॉन्स्टेलेशन नावाच्या या बारची क्षमता ३०० लोकांची आहे आणि त्याच्या टेरेसवर ४० लोक राहू शकतात.
एका प्रवक्त्याने सांगितले की, नवीन वर्षाचा दिवस साजरा करण्यासाठी सुमारे १०० लोक तिथे जमले होते. न्यू यॉर्कमधील एका पर्यटकाने बारमधून बाहेर पडणाऱ्या ज्वालांचे चित्रीकरण केले आणि एएफपीला सांगितले की, त्याने लोकांना अंधारात धावताना आणि ओरडताना पाहिले.
हेही वाचा-

