ETV Bharat / health-and-lifestyle

हिवाळी फ्लू आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ 5 टिप्स

हिवाळ्यातील फ्लू आणि न्यूमोनिया समस्येने अनेक लोक त्रस्त असतात. परंतु तुम्ही तज्ञांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्यास त्यापासून आराम मिळवू शकता.

WINTER CARE TIPS  HOW TO PREVENT PNEUMONIA  PREVENTING SEASONAL FLU  HOW TO PREVENT FLU
हिवाळी फ्लू आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ 5 टिप्स (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : January 7, 2026 at 5:41 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

How to prevent flu: सध्या हिवाळ्याने सर्वत्र वातावरण थंडगार झाले आहे. अशात खोकला, सर्दी तसंच फ्लू आणि न्यूमोनियासारख्या संसर्गांनी कळस गाठला आहे. हवमान जितके जास्त थंड तितके विषाणू अधिक सहजपणे पसरतात. म्हणजेच यामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. हात धुणे, निरोगी आहार आणि उबदार कपडे घालणे यासारखे साधे उपाय करून आपण आजारापासून दोन पावलं दूर राहू शकतो. मात्र, आपल्याला झालेला फ्लू साधा आहे की गंभीर स्वरुपाचा हे ओळखणे कठीण ठरू शकतं. कारण खोकला, थकवा, घसा बसणे, अंगदुखी किंवा अगदी धाप लागण्यासारखी लक्षणे ही फ्लूसारख्या श्वसनसंस्थेच्या आजाराची किंवा न्यूमोनियाचीही असू शकतात. यामुळे काही लक्षणं दिसल्यास ते हलक्यात न घेता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम ठरते.

WINTER CARE TIPS  HOW TO PREVENT PNEUMONIA  PREVENTING SEASONAL FLU  HOW TO PREVENT FLU
हिवाळी फ्लू आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ 5 टिप्स (Getty Images)

दिल्ली येखील एमबीबीएस एमडी पीडिअ‍ॅट्रिक डॉ. अरुण वाधवा यांच्या मते, हिवाळी आजारांचे प्रमाण वाढत असताना योग्य चाचण्या करून आजाराचं निदान करूण घेणं हाच आजारातून बरे होण्याचा आणि गुंतागूंत टाळण्याचा एकमेव मार्ग आहे. तुम्हाला मोसमी संसर्गांशी निगडीत संसर्ग झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. सुरक्षित आणि निरोगी राहण्याकरिता डॉक्टरांचा सल्ला घ्या असं त्यांच मत आहे.

वेळोवेळी तपासण्या करून घेण्याची गरज: आजच्या वेगवान आयुष्यामध्ये, कुणालाही आजारामुळे घरी राहण्याची इच्छा नसते. यामुळे त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि काही आवश्यक चाचण्या करून घेणे गरजेचं आहे. आजकाल त्वरीत रिझल्ट देणाऱ्या चाचण्या उपलब्ध आहेत. फ्लू आणि न्यूमोनियासारख्या श्वसनसंस्थेच्या आजारांचे निदान करण्याचा एक झटपट व कार्यक्षम मार्ग आहे.

मेडिकल अफेअर्स डायरेक्टर, इन्फेक्शियस डिजिज, अबॉट डॉ. सोनू भटनागर यांनी वेळीच तपासण्या करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितलं की, “श्वसनसंस्थेला होणाऱ्या संसर्गांना परिणामकारकरित्या हाताळण्यासाठी चाचण्या महत्त्वाची भूमिका बजावतात. श्वसनासंबंधित वेगवेगळ्या आजारांसाठी रॅपिड टेस्टिंग सारखे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे झटपट आणि अचूक निदान लागणे शक्य होते.”

WINTER CARE TIPS  HOW TO PREVENT PNEUMONIA  PREVENTING SEASONAL FLU  HOW TO PREVENT FLU
हिवाळी फ्लू आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ 5 टिप्स (Getty Images)

हिवाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही साध्यासोप्या उपाययोजना

1. चाचणी करून घ्या: आपण कशामुळे आजारी पडतो आहेत हे माहीत करणे हे बरे होण्याच्या दिशेने उचललेले पहिलं पाऊल आहे. तुम्हाला श्वसनसंस्थेच्या एखाद्या संसर्गाची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि झटपट चाचण्या करून घेण्याचा विचार करा. रॅपिड टेस्ट्समुळे लवकर रिझल्ट मिळण्यास मदत होते. त्यामुळे योग्य उपचार निवडण्यास पर्याय मिळतो. परिणामी यामुळे तुम्हाला लवकर बरं होण्यास मदत होते.

2. आपल्या स्थितीवर देखरेख ठेवा: लक्षणांवर आणि त्यांच्या तीव्रतेवर लक्ष ठेवा. ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

3. उपचार घ्या: संसर्गाचे लवकर निदान झाल्यास तुम्ही तत्परतेने उपचार मिळवू शकता. औषधांचा संपूर्ण कोर्स काटेकोरपणे करा, संसर्गाशी दोन हात करण्यासाठी आणि लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.

4. स्वत:ची काळजी घ्या: शरीराची आर्द्रतेची पातळी राखण्यासाठी भरपूर पाणी प्या. ( तुम्ही पाणी, ब्रॉथ, शहाळ्याचे पाणी किंवा फ्रूट ज्युस आणि सकस आहार नियमित घ्या.

5. घरी रहा: आजाराची लक्षणं जाणवल्यास तुम्ही स्वत:ला वेगळं करा. असं केल्यानं बरे होण्यासाठी वेळ मिळेल तसंच संसर्गाची लागण इतरांना होणार नाही

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा