
ETV Bharat / health-and-lifestyle
सावधान! तुम्ही देखील रात्री ब्रा घालून झोपता काय?
स्तनांचा आकार योग्य ठेवण्यासाठी ब्रा महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु बऱ्याच महिला रात्री ब्रा घालून झोपतात हे योग्य आहे काय? वाचा सविस्तर..,

Published : October 15, 2025 at 7:25 PM IST
Is It bad To Sleep With A bra On: महिलांना शरीराच्या काळजीकरिता अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यापैकी एक म्हणजे ब्रा. ब्रा ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. ब्रा घालण्याचे महिलांना अनेक फायदे आहेत. मात्र, ब्रा कधी घालावी आणि कधी घालू नये याची जाणीव असणे आवश्यक आहे. कारण ब्रा आरोग्याशी संबंधित आहे. बहुतांश महिला ब्रा घालूनच झोपतात. परंतु रात्री झोपताना ब्रा घालून झोपण्याची सवय चांगली नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ब्रा घालून झोपल्याने रक्ताभिसरण, त्वचेचे आरोग्य आणि झोपेवर त्याचा वाईट परिणाम होतो, असं तज्ञांचं म्हणणं आहे. रात्री ब्राशिवाय का झोपावे? ब्रा घालून झोपण्याचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया.

- रात्री ब्रा का घालू नये? बुरशीजन्य संसर्ग आणि खाज सुटण्याचा धोका: रात्री झोपताना ब्रा घातल्याने स्तनांभोवती जास्त घाम येतो. यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. परिणामी त्वचेवर जळजळ तसंच पुरळ होऊ शकतात. यामुळे खाज सुटू शकते. म्हणूनच महिलांनी रात्री ब्रा घालू नये.
- काळे डाग: दिवसभर घट्ट ब्रा घातल्यानंतर, रात्री ती काढून झोपणे चांगले. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला स्तनाभोवतीच्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि खाज येऊ शकते. कारण स्तनांची त्वचा खूप संवेदनशील असते. ब्राच्या पुरळांकडे दुर्लक्ष केल्याने त्वचेवर काळे डाग येऊ शकतात. म्हणून, रात्री ब्रा काढून झोपणे योग्य मानले जाते.
- ऍलर्जीच्या समस्या: जास्त वेळ ब्रा घातल्याने स्तनांभोवती घाम साचतो. रात्रीच्या वेळी ब्रा काढली नाही तर त्वचा कोरडी होण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे त्वचेला हवा मिळत नाही. ओलाव्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो. यामुळे फोड आणि अॅलर्जी होऊ शकते.
- रक्ताभिसरणावर परिणाम: रात्रभर घट्ट ब्रा घालून झोपल्याने स्तनांभोवती रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. दाबामुळे शिरा आकुंचन पावतात. त्यामुळे स्तनात वेदना, सूज आणि बधीरपणा यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच महिलांनी याबाबत खूप काळजी घ्यावी असं तज्ञांचं मत आहे.

- निद्रानाश: झोपताना आरामदायी कपडे घालणे महत्वाचे आहे. घट्ट ब्रा घालून झोपल्याने गरमी होते परिणामी घामाची समस्या उद्भवते. त्यामुळे आरामदायी वाटत नाही. याचा परिणाम झोपेवर होतो. नीट झोप येत नाही. झोपेतही खंड पडतो. झोपेवर परिणाम झाल्यास दिवसभर थकवा जाणवतो.
- स्तनाच्या कर्करोगाचा धोका: रात्री ब्रा काढून झोपल्याने स्तनाच्या स्नायूंना विश्रांती मिळते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते. यामुळे स्तनांच्या आरोग्यापासून ते सामान्य आरोग्यापर्यंत सर्व काही सुधारते. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, रात्री ब्रा घालून झोपल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. परंतु, या विषयावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी ब्रा काढने चांगले. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

