ETV Bharat / health-and-lifestyle

तणाव आणि नैराश्यामुळे तरुण वयातच हृदविकाराचे झटके; कशी करावी सुटका?

तणावामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या आरोग्य समस्या उद्भवतात. यामुळे ताण कमी करणे गरजेचं आहे. ताण कसा कमी करायचा हे जाणून घेण्यासाठी वाचा...

DEPRESSION CAUSING HEART ATTACKS  PHYSICAL EFFECTS OF STRESS ON BODY  CAN STRESS CAUSE A HEART ATTACK
तणाव आणि नैराश्यामुळे तरुण वयातच हृदविकाराचे झटके; कशी करावी सुटका? (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : December 6, 2025 at 7:20 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

Depression causing heart attacks: जीवन जगताना कधी ना कधी ताण येतोच. ताण हा जीवनाचा एक भाग आहे, परंतु जेव्हा ताणाचा अतिरेक होतो तेव्हा हृदयरोगांसह गंभीर मानसिक आणि शारीरिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) च्या अलीकडेच करण्यात आलेल्या अभ्यासात कामाशी संबंधित जास्त ताणाचे हृदयाच्या आरोग्यावर होणारे धोकादायक परिणाम अधोरेखित केले आहेत. अभ्यासात असं आढळून आलं आहे की, तीव्र ताणामुळे हृदयाच्या लयीत अचानक बदल होऊ शकतात, ज्यामुळे ‘वेंट्रिक्युलर टाकीकार्डिया’ आणि ‘वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन’ सारख्या परिस्थिती उद्भवू शकते, या दोन्ही हृदयाच्या खालच्या भागांवर परिणाम करतात.

DEPRESSION CAUSING HEART ATTACKS  PHYSICAL EFFECTS OF STRESS ON BODY  CAN STRESS CAUSE A HEART ATTACK
तणाव आणि नैराश्यामुळे तरुण वयातच हृदविकाराचे झटके; कशी करावी सुटका? (Getty Images)

या अभ्यासात 18 ते 60 वयोगटातील 6,000 लोकांचा समावेश होता ज्यांचे 18 वर्षे निरीक्षण करण्यात आले. संशोधनातून असा निष्कर्ष निघाला की, ज्यांना जास्त ताण येतो त्यांना एट्रियल फायब्रिलेशन (एएफ) होण्याचा धोका 83 टक्के जास्त असतो, जो अनियमित हृदयाचे ठोके दर्शविला जाणारा आजार आहे. स्टार हॉस्पिटल्सचे वरिष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. रमेश गुडापती यांनी यावर भर दिला. त्यांच्यानुसार हृदयरोग रोखण्यासाठी प्रभावी नियोजन आणि ताण व्यवस्थापन आवश्यक आहे.

DEPRESSION CAUSING HEART ATTACKS  PHYSICAL EFFECTS OF STRESS ON BODY  CAN STRESS CAUSE A HEART ATTACK
तणाव आणि नैराश्यामुळे तरुण वयातच हृदविकाराचे झटके; कशी करावी सुटका? (Getty Images)

ताणाचा हृदयावर कसा परिणाम होतो? एट्रियल फायब्रिलेशन (एएफ) असलेल्या लोकांमध्ये, हृदयात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. ज्या मेंदूपर्यंत जाऊ शकतात आणि स्ट्रोकची समस्या उद्भवू शकते. तसंच गुठल्या पायापर्यंत पोहचल्या की गॅंग्रीन किंवा पाय कापण्याची वेळ येऊ शकते. दुसरीकडे, व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशनमुळे हृदयाची गती प्रति मिनिट 300 पेक्षा जास्त होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो आणि मृत्यू होतो. वयानुसार एरिथमिया किंवा अनियमित हृदयाचे ठोके अधिक सामान्य होतात, परंतु ताण हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे.

ताणाची कारणे: ताण हा करिअर, कुटुंब, आर्थिक स्थिती, अभ्यास आणि सामाजिक संबंध अशा अनेक कारणांमुळे होऊ शकतो. जास्त अपेक्षा असणे हे ताणाचे एक प्रमुख कारण आहे. कारण त्यामुळे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत दबाव निर्माण होतो. ज्यामुळे अपयश आणि निराशेची भावना निर्माण होते. ज्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. कालांतराने, शरीर जास्त ताण तणाव संप्रेरक सोडतो, ज्यामुळे रक्तदाब, थकवा वाढू शकतो आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येण्याचा धोका वाढू शकतो. डॉ. गुडापती स्पष्ट करतात की, तुमच्या मर्यादा समजून घेतल्याने आणि वास्तववादी अपेक्षा ठेवल्याने ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. वेळ व्यवस्थित व्यवस्थापित करणे आणि व्यायाम आणि ध्यान यासारख्या आरामदायी क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहणे देखील महत्त्वाचे आहे.

DEPRESSION CAUSING HEART ATTACKS  PHYSICAL EFFECTS OF STRESS ON BODY  CAN STRESS CAUSE A HEART ATTACK
तणाव आणि नैराश्यामुळे तरुण वयातच हृदविकाराचे झटके; कशी करावी सुटका? (Getty Images)

एरिथमिया आणि जास्त स्ट्रेसची लक्षणे

  • हृदयाचे ठोके खूप हळू, खूप जलद किंवा अनियमित होणे.
  • विश्रांती घेत असतानाही हृदयाचे ठोके जलद होणे
  • खूप जास्त थकवा
  • चक्कर येणे किंवा अशक्तपणा
  • जास्त ताण
  • निद्रानाश
  • स्नायू वेदना आणि डोकेदुखी
  • खूप जास्त थकवा
  • चिंता, चिडचिडेपणा आणि नैराश्य यासारखे भावनिक बदल
  • जास्त खाणे किंवा भूक न लागणे
DEPRESSION CAUSING HEART ATTACKS  PHYSICAL EFFECTS OF STRESS ON BODY  CAN STRESS CAUSE A HEART ATTACK
तणाव आणि नैराश्यामुळे तरुण वयातच हृदविकाराचे झटके; कशी करावी सुटका? (Getty Images)

ताण कसा व्यवस्थापित करायचा आणि कमी कसा करायचा

  • वेळेचे व्यवस्थापन: तुमचे काम सकारात्मक दृष्टिकोनाने व्यवस्थित करा. प्रभावी वेळेचे व्यवस्थापन आणि वास्तववादी ध्येये निश्चित करणे आवश्यक आहे.
  • वास्तववादी अपेक्षा:- स्वतःवर जास्त ओझे लादू नये म्हणून, तुमच्या व्यावसायिक ध्येयांना तुमच्या खऱ्या क्षमतांशी जुळवा.
  • कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा: सामाजिक आधारामुळे ताण कमी होतो. प्रियजनांसोबत वेळ घालवणे आणि तुमच्या चिंता शेअर करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
  • व्यायाम: शारीरिक हालचाली हा ताण कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. नियमित व्यायामामुळे एंडोर्फिन बाहेर पडतात. योग आणि ध्यान हे देखील ताण व्यवस्थापनात उपयुक्त आहेत.
  • वाईट सवयी टाळा: ताणतणावाचा सामना करण्यासाठी धूम्रपान किंवा मद्यपान केल्याने ताणतणावाशी संबंधित आरोग्य समस्या वाढू शकतात.
  • संतुलित आहार:- ताणतणावामुळे जास्त खाणे किंवा भूक न लागणे या समस्येपासून वाचण्यासाठी, निरोगी आहार घ्या.
  • पुरेशी झोप घ्या: योग्य विश्रांती आणि पुनर्प्राप्तीसाठी, दररोज 6-8 तासांची झोप घ्या.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा