ETV Bharat / health-and-lifestyle

सकाळी केलेल्या ‘या’ चुका किडनीसाठी धोकादायक!

निरोगी राहण्यासाठी किडनीचं आरोग्य सुरळीत ठेवणे गरजेचं आहे. कारण किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. वाचा सविस्तर..,

KIDNEY DAMAGE REASONS  KIDNEYS AND MORNING HABITS  HOW CAUSES KIDNEY FAILURE  CAUSES KIDNEY FAILURE
सकाळी केलेल्या ‘या’ चुका किडनीसाठी धोकादायक! (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : February 12, 2026 at 3:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

HOW CAUSES KIDNEY FAILURE: किडनी हे शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. कारण, ते शरीरातील कचरा फिल्टर करणे आणि रक्तदाब नियंत्रित करणे यासारखी महत्त्वाची कामे करते. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, जगभरात सुमारे 850 दशलक्ष लोक कोणत्या ना कोणत्या किडनीच्या समस्येने ग्रस्त आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली, अस्वस्थ्यकार आहार आणि व्यायामाचा अभाव. त्याचबरोबर काही अनुवंशिक कारणांमुळे देखील किडनीच्याकार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त लोकांमध्ये किडनीसंबंधित आजारांचा धोका जास्त असतो. तसंच तज्ञांच्या मते, सकाळच्या काही चुका मूत्रपिंडावर गंभीर परिणाम करू शकतात. त्या कोणत्या ते पाहूया....

सकाळी पाणी न पिणे: रात्रभर झोपल्यानंतर शरीर डिहायड्रेट होते. तज्ञांचं म्हणणं आहे की, सकाळी उठल्यावर आपण पाणी पिणे टाळले, तरी मूत्रपिंड कचरा फिल्टर करत राहतो. अशा परिस्थितीत, आपण पाण्याऐवजी थेट कॉफी किंवा चहा पिल्याने किडनीवर दबाव वाढतो. यामुळे सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिण उत्तम आहे. सकाळी उठताच एक ग्लास पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतातच, शिवाय गाळण्याची प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. युरोपियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल अँड मेडिकल रिसर्चनुसार, सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने केवळ चयापचय दर वाढत नाही तर किडनीचे कार्य देखील चांगले होण्यास मदत होते.

लघवी रोखून ठेवणे: झोपेतून उठल्यानंतर किंवा कामामुळे बरेच लोक लघवी रोखून ठेवतात. मात्र, तज्ञांचं म्हणणं आहे की, जास्त वेळ लघवी रोखून ठेवणे चांगले नाही. कारण आपण झोपेत असताना मूत्राशय ताणले जाते. म्हणून, जागे झाल्यानंतरही ते रिकामे करण्यास उशीर केला तर मूत्राशय आणि मूत्रपिंडांवर दबाव वाढू शकतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे मूत्रपिंडात संसर्ग देखील होऊ शकतो.

जेवणादरम्यान वेदनाशामक औषधे घेणे: अनेक लोकांना डोकेदुखी किंवा स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्ज ( NSAIDs ) वापरण्याची सवय असते. तज्ञांचं म्हणणं आहे की, अन्नाशिवाय ती घेतल्याने केवळ पोटच नाही तर मूत्रपिंडांनाही नुकसान होऊ शकते. तसंच जेव्हा ही औषधं जेवणादरम्यान घेतली जातात तेव्हा ती रक्तप्रवाहात लवकर प्रवेश करतात आणि मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवतात. म्हणून, काहीतरी खाल्ल्यानंतर औषधं घेणं चांगलं. नॅशनल किडनी फाउंडेशनच्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ओव्हर-द-काउंटर वेदनाशामक (NSAIDs) आणि वेदनाशामक औषधांमुळे मूत्रपिंडांना नुकसान होऊ शकते.

व्यायामानंतर पुरेसे पाणी न पिणे: सकाळी व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु, बरेच लोक व्यायामानंतर पाणी पित नाहीत. तज्ञांचं म्हणणं आहे की, यामुळे डिहायड्रेशन होते. परिणामी किडनीवर दबाव वाढतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, रीहायड्रेशन म्हणजे फक्त पाणी पिणे नाही तर इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेये पिणे आवश्यक आहे . अन्यथा, किडनीमध्ये रक्त परिसंचरण कमी होते आणि दाब वाढतो.

नाश्ता वगळणे: तज्ञांचं म्हणणं आहे की, नाश्ता वगळल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. ज्यामुळे जास्त मीठ असलेल्या जंक फूडची इच्छा निर्माण होऊ शकते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, जास्त सोडियमचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि मूत्रपिंडांना नुकसान होऊ शकते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा