ETV Bharat / health-and-lifestyle
काय आहे जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य? जाणून घ्या
जपानी लोक वृद्धापकाळातही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, चपळतेसाटी आणि तंदुरुस्त शरीरासाठी ओळखले जातात. हे लोक इतके निरोगी आणि सक्रिय का आहेत याचे कारण म्हणजे त्यांची जीवनशैली.

Published : December 11, 2025 at 1:48 PM IST
Japanese people health secret: आपल्या सध्याची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे, आपल्याला वयाच्या 30 किंवा 40 व्या वर्षी पाठदुखी आणि गुडघेदुखीसारख्या एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही अंतर चालल्यानंतरही आपल्याला थकवा जाणवतो. वजन कमी करण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देतो. वाढत्या समस्यांना तोंड देताना 60 वर्षांनंतर आपली स्थिती कशी असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. जर कोणी 100 वर्षे चांगल्या आरोग्यासह जगला तर आपण त्याला एक विक्रम मानतो.
मात्र, जपाली लोक वृद्धापकाळातही त्यांचं आयुष आनंदी, आणि तंदुरुस्त जगतात. ते त्यांच्या 100 वा वाढदिवस देखील साजरा करतात. जपानी लोक इतके निरोगी आणि सक्रिय का आहेत याचे कारण म्हणजे त्यांची जीवनशैली. ते त्यांच्या आहाराची खूप काळजी घेतात. त्यांच्या आहारात भाज्या आणि सीफूड, कमीत कमी मसाले आणि मीठ असते. तसंच ते हंगामी पदार्थ खाण्याला प्राधान्य देतात. ते 'हरा हाची बु' तंत्राचे पालन करतात. डॉ. तरंग यांच्या मते, ही सवय निरोगी, उत्साही आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.

- 'हारा हाची बु' म्हणजे काय? जपानी लोक जास्त अन्न घेतलं जाऊ नये म्हणून पोट घट्ट ठेवून जेवतात. 'हारा हाची बु' सिद्धांतानुसार, पोटभर जेवण्याऐवजी, फक्त 80 टक्के अन्न खावे आणि 20 टक्के पोट रिकामं ठेवतात. ते खूप कमी किवा जास्तही खात नाहीत. जपानी लोक त्यांच्या शरीराला तेवढेच अन्न देतात जेवढं ते आरामात पचवू शकतात. त्यासोबतच जपानी महिला त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच निश्चित प्रमाणात खाण्याची सवय लावतात. ही सवय केवळ पचनसंस्था सक्रिय ठेवत नाही तर पोटाच्या आरोग्यासाठी देखील चांगली असते. हारा हाची बु जवळपास जपानच्या अनेक भागातील मुले, प्रौड आणि अगदी 90 वर्षावरील लोकही या तत्त्वाचं पालन करतात. याचं पालन केल्यानं जास्त काळ ऊर्जा टिकून राहते. आळस टाळता येतो, पोट जड होण्यापासून रोखता येते आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. जपानी लोक हे शतकानुशतके पाळत आहे म्हणून ते तत्व पिढ्यान्-पिढ्या चालत आलं आहे.
- 'हारा हाची बु' सह दीर्घायुष्य: काही प्रकरणांमध्ये असं दिसून आले आहे की 'हारा हाची बु' खाण्याची सवय आयुर्मान वाढवू शकते. 100 वर्षांहून अधिक काळ जगलेल्या ओकिनावावासीयांनी त्यांच्या दीर्घायुष्याचे श्रेय तेयांनी 'हारा हाची बु' ला दिलं आहे. अमेरिकन जर्नल ऑफ लाइफस्टाइल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या 2016 च्या अभ्यासानुसार, जास्त खाणं कमी केल्यानं पेशींचे आरोग्य सुरक्षित राहते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत होते असं स्पष्ट करण्यात आले आहे.
- वजन कमी: 'हारा हाची बु' मध्ये, आपण जाणीवपूर्वक जेवतो आणि जास्त खाणं टाळतो. 2015 मध्ये 'ईटिंग बिहेवियर्स' मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ते अन्नाची तीव्र इच्छा आणि जास्त खाणे कमी करते. पोट 20 टक्के रिकामे ठेवल्याने वजन वाढण्याचा धोका कमी होतो. तसेच त्यामुळे भूक कमी होते आणि तृप्ति वाढवते.
- हे होतात फायदे: जर्नल ऑफ इटिंग डिसऑर्डर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 'हारा हाची बु' जास्त खाण्याची लालसा कमी करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील जळजळ नियंत्रणात राहते. तज्ञांचं म्हणणं आहे की, 'हारा हाची बु' ही आहारपद्धती हृदयरोगाचा धोका देखील कमी करते. तसंच डॉ. तरंग यांच्या मते, यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसंच पचक्रिया सुरळीत होऊन आपल्याला दिवसभर ऊर्जादायी वाटते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

