ETV Bharat / health-and-lifestyle
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ‘हा’ काळा पदार्थ आहे फायदेशीर; आजच करा आहारात समावेश
काळे मनुके हे एक स्वादिष्ट आणि पौष्टीक सुपरफूड आहे. जे असंख्य आरोग्य फायदे प्रदान करते. त्यात खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ‘हा’ काळा पदार्थ आहे फायदेशीर; आजच करा आहारात समावेश (Getty Images)

Published : February 23, 2026 at 1:19 PM IST
BLACK RAISINS: बरेच लोक बदाम, मनुके आणि काजू सारखे ड्राय फ्रुट्स कच्चे खातात. परंतु, तज्ञांचं म्हणणं आहे की, ते भिजवल्याने या घटकांमधील पोषक घटक दुप्पट होतात. असंही म्हटलं जातं की, भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने अतिरिक्त आरोग्य फायदे मिळू शकतात. तर, आता ते काय आहेत ते जाणून घेऊया!
- अशक्तपणा दूर करण्यासाठी फायदेशीर: मासिक पाळी आणि गरोदरपणात महिलांचे खूप रक्त कमी होते. यामुळे महिलांना अशक्तपणा जाणवतो. मात्र, जर्नल ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च इंटरनॅशनलने प्रकाशित केलेल्या एक अभ्यासानुसार, काळे मनुके ही समस्या सोडवू शकतात. कारण त्यात जास्त प्रमाणात लोह असते. तज्ञांचं म्हणणं आहे की, जर तुम्ही ते थेट खाण्याऐवजी भिजवले तर शरीर लोह अधिक सहजपणे शोषून घेते. यामुळे रक्त प्रवाह वाढतो, थकवा आणि आळस दूर होतो आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
- संतुलित हार्मोन्स: हार्मोनल असंतुलन ही अनेक महिलांसाठी गंभीर समस्या आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की, यामुळे अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, प्रजनन समस्या, मुरुमं आणि नको असलेले केस यासारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. हे टाळण्यासाठी, दररोज आहारात भिजवलेले काळे मनुके समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते . त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे बी, सी आणि के. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखी खनिजे हार्मोन्स तयार करणाऱ्या अधिवृक्क ग्रंथींचे कार्य सुधारतात असं म्हटलं जातं. हे हार्मोन्सचे उत्पादन संतुलित करते असं देखील म्हटलं जातं. तसंच काळे मनुके शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे.
- प्रजनन क्षमता: सध्या अनेक महिलांना वंध्यत्वाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा महिलांसाठी काळे मनुके वरदान असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे, की ते लोह, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत आणि प्रजनन प्रणालीचे कार्य सुधारतात. यामुळे गर्भवती होण्याची शक्यता सहज वाढते. असे स्पष्ट केले आहे की ते भिजवून खाल्ल्याने गर्भाशयाचे कार्य सुधारते आणि निरोगी अंडी बाहेर पडतात. तसेच, ते गर्भधारणेदरम्यान आरोग्य राखण्यास मदत करतात आणि गर्भातील न्यूरल ट्यूबच्या वाढीस हातभार लावतात.
- हाडांच्या बळकटीसाठी उत्तम: वयानुसार हाड कमकुवत होतात. ऑस्टियोपोरोसिसमुळे रजोनिवृत्तीच्या टप्प्यात प्रवेश केलेल्या महिलांमध्ये ही समस्या अधिक तीव्र होते असं तज्ञांचं म्हणणं आहे. असं म्हटलं जातं की, दररोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने शरीर त्यांच्यामध्ये असलेले कॅल्शियम सहजपणे शोषून घेतो. यामुळे हाडांची ताकद वाढते. असं स्पष्ट झालं आहे की पौगंडावस्थेपासून नियमितपणे भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने वृद्धापकाळात हाडांशी संबंधित समस्या टाळता येतात.
- चमकदार त्वचेसाठी सर्वोत्तम: अनेक मुली सुंदर दिसण्याकरिता खूप प्रयत्न करतात. आपण इतरांपेक्षा सुंदर दिसावं म्हणून मुली आणि महिला अनेक महागडे प्रोडक्ट्स देखील वापरतात. परंतु तज्ञ म्हणतात की, बाहेर उपलब्ध असलेल्या कॉस्मेटिक उत्पादनांपेक्षा नैसर्गिक घटकांचा वापर करणे चांगले आहे. त्यांच्या मते काळ्या मनुक्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे चांगले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे, की ते दररोज भिजवून सेवन केल्याने त्वचा उजळते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवतात आणि वयाचे डाग दिसण्यापासून रोखतात. तसंच, असं म्हटलं जातं की, व्हिटॅमिन 'सी' कोलेजनचे उत्पादन वाढवते आणि त्वचेवर चमक आणते.
- किती खावे? : तज्ञांचं म्हणणं आहे की, भिजवलेल्या काळ्या मनुकाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ज्यात पचन सुधारणे, त्वरित ऊर्जा, हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि वजन नियंत्रण यांचा समावेश आहे. मात्र, ते जास्त प्रमाणात सेवन करणे चांगले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते असे सुचवतात की दररोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा कप पाण्यात 6 ते 10 काळे मनुके भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते खा. तसंच भिजवलेल्या मनुकांचं पाणी पिल्याने हे सर्व आरोग्य फायदे दुप्पट मिळतील.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

