ETV Bharat / health-and-lifestyle
सावधान! विकेंडला जास्त झोपल्यास होतात ‘हे’ दुष्परिणाम
आपल्यापैकी अनेकांना विकेंडला जास्त वेळ झोपून राहण्याची सवय असते. यामुळे नकळत आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वाचा सविस्तर..,

Published : December 10, 2025 at 5:26 PM IST
is Oversleeping bad for health: आजकाल प्रत्येकाचं आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे. बऱ्याचं जणांकडे स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ नाही. झोपेपासून ते स्वतःची काळजी घेण्यापर्यंत. चांगली झोप ही व्यक्तीच्या आहार आणि जीवनशैलीइतकीच महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घेतली तरच आपण दुसऱ्या दिवशी सक्रिय राहू शकतो. परंतु, बरेच लोक आठवडाभर नीट झोपत नाहीत. ते सोशल मीडिया आणि फोनवर बराच वेळ घालवतात नंतर उशिरा झोपायला जातात आणि सकाळी ऑफिस आणि कॉलेजला जाण्यासाठी घाईघाईने उठतात. यामुळे बऱ्याच लोकांची पुरेशी झोप होत नाही. या कारणास्तव बरेच लोक आठवड्याच्या शेवटी जास्त झोपतात. परंतु या सवयींमुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे उद्भवणाऱ्या समस्या तुम्हाला माहिती आहेत का?

झोप घेणं काही काळ ठीक आहे, पण जास्त प्रमाणात घेतल्याने तुम्ही आजारी पडू शकता: चांगलं आयुष्य जगण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. झोपेच्या वेळी आपलं शरीर स्वतःची दुरुस्ती करते. बहुतेक समस्या पुरेशी झोप घेतल्यानं सुटतात. हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी तासंतास झोपणे चांगलं नाही. यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

शरीरातील साखरेची पातळी कमी: रात्री उशिरा झोपल्यानंतर आपण सकाळी उशिरा उठतो आणि उशिरा जेवतो. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते. जेवणाच्या वेळा बदलतात. घरी शिजवलेले पदार्थ खाण्याऐवजी आपण आपले आवडते पदार्थ खातो. विशेषतः सहज उपलब्ध असलेले जंक फूड खाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ते पचायला कठीण होते. यामुळे दिवसभर आरामात घालवण्यासाठी असलेली तुमची सुट्टी थोडी गोंधळात जाते.
पचन समस्या: सकाळी उशिरा उठणे म्हणजे नाश्ता न करणे. यामुळे शरीराला त्या वेळेपूर्वी भूक लागते आणि बराच वेळ न खाल्ल्याने आम्लता वाढते. यामुळे पोट फुगते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवतात. म्हणून, त्याऐवजी, थोडे उशिरा उठून काहीतरी खाणं आणि योग्य जेवणाच्या वेळा पाळणे चांगले.
दुसऱ्या दिवशी परिणाम:उदाहरणार्थ, रविवारी उशिरापर्यंत जागे राहणे, दुपारी झोपणे यामुळे रविवारी रात्री झोपणे कठीण होते. यामुळे आपल्याला झोपायला उशिर होतो. परिणामी सोमवारी सकाळी उठणे कठीण होते. असं संपूर्ण आठवडाभर चालू राहते. यामुळे आपली दैनंदिन दिनचर्या पुन्हा नियंत्रित करण्यासाठी बराच वेळ लागतो.
सुस्ती, चिडचिड, थकवा: जर झोप पुरेशी झाली नाही तर दिवसभर सुस्तपणा आणि तंद्री जाणवते. कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. म्हणून, आठवड्याच्या शेवटीही झोपेचे वेळापत्रक योग्य असलं पाहिजे. अन्यथा, तुमचं चयापचय मंदावेल, वजन वाढेल आणि इतर समस्या उद्भवतील.
योग्य दृष्टिकोन कोणता आहे? आठवड्याच्या शेवटी विश्रांती घेणे महत्वाचे आहे. मात्र, दिवसभर विश्रांती घेण्याऐवजी, अर्धा तास किंवा एक तास उशिरा उठा. त्याचप्रमाणे, संपूर्ण आठवड्यात पुरेशी झोप मिळेल याची खात्री करा. सोशल मीडियाचा वापर कमी करा. जर तुम्हाला हवे असेल तर दुपारी आणि इतर वेळी तुमचे फोन तपासा. परंतु, रात्री त्या फोनमध्ये हरवून झोपेचा त्याग करू नका. रात्रीची चांगली झोप घेणे आणि तुमचे आरोग्य जपणे महत्वाचे आहे हे विसरू नका, मग तो आठवड्याचा शेवट असो किंवा कोणताही दिवस असो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/27743803/

