ETV Bharat / health-and-lifestyle

तुम्ही देखील हिरवे मटार खाताना या चुका करता का? ठरू शकतं ‘या’ समस्यांना आमंत्रण

कमी-अधिक प्रमाणात हिरवे मटार खाणं अनेकांना आवडतं. हिरवे मटार जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होऊ शकते, तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर...

GREEN PEAS HEALTH BENEFITS  SIDE EFFECT OF GREEN PEAS  GREEN PEAS NUTRITIONAL VALUE  GREEN PEAS
हिरवे मटर खाण्याचे फायदे (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : January 2, 2026 at 2:04 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

Green peas health benefits: हिवाळ्याच्या हंगामात बाजारात ताज्या हिरव्या भाज्या सहज उपलब्ध असतात. तसंच या हंगामात जास्त प्रमाणात हिरवे मटार देखील उपलब्ध असतात. बहुतांश लोकांना हिरवे मटार खाणं आवडतं. भाजी, पुलाव तसंच इतर पदार्थ हिरवे मटार घालून बनवले जातात. हिरव्या मटारमध्ये लोह, जस्त, मॅंगनीज शिवाय अँटीऑक्सिडंट्स देखील पुरेशा प्रमाणात आढळतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? हिरवे मटार खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. पोषणतज्ज्ञ लीमा महाजन म्हणतात की, बहुतेक लोकांना हिरवे मटार खाण्याची योग्य पद्धत माहित नसते आणि त्यामुळे त्यांना पोटदुखी, अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो. जर तुम्ही हिरवे मटार योग्य पद्धतीने खाल्ले तर या समस्या उद्भवणार नाहीत. हिरवे मटार कसे फायदेशीर आहेत आणि त्याचं सेवन कसं करावं याबद्दल लीमा यांनी इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. चला तर जाणून घेऊया हिरवे मटार खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे.

हिरव्या मटारमध्ये काय आढळतं? हिरव्या मटारमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे सी, के आणि बी कॉम्प्लेक्स, मॅंगनीज, तांबे, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हिरवे मटर हे प्री-बायोटिक देखील असतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. ते खाल्ल्याने शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून निघते आणि ते त्वचा आणि केसांसाठी देखील चांगलं असतं.

जास्त खाण्याचे तोटे: पोषणतज्ज्ञ म्हणतात की, जर तुम्हाला हिरवे मटार खाणं फायदेशीर वाटत असेल आणि ते जास्त खाल्ल्याने फायदाच होईल असे तुम्हाला वाटत असेल तर ते अनेक प्रकारे नुकसानदायक ठरू शकते, हे लक्षात घ्या. जर तुम्ही जास्त हिरवे मटार खाल्ले तर ते तुमच्या शरीरात आयबीएसला चालना देऊ शकते. विशेषतः ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी मटार मर्यादित प्रमाणात खावेत. अजिबात न खाणं हा पर्याय योग्य नाही तर प्रमाणात खावे. 100 ग्रॅम वाटाण्यामध्ये 5-6 ग्रॅम प्रथिने असतात. हिरवे मटार खाण्याचे काय नुकसान आहेत ते पाहूया.

- जास्त मटार खाल्ल्याने पोट फुगू शकते. ज्यामुळे दिवसभर पोट फुगलेले राहते आणि पोटात गॅस राहतो.

- जास्त मटार खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.

- पोटदुखी समस्या होते.

- कधीकधी जास्त मटार खाल्ल्याने मळमळ, उलट्या, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास होतात.

- जास्त हिरवे मटार खाल्ल्याने भूक कमी होऊ शकते.

तुम्ही किती खावे? लीमा महाजन म्हणतात की तुम्ही दिवसभरात 2 चमचे हिरवे मटार खावे, म्हणजे फक्त 30 ग्रॅम. मुलांना फक्त 1 चमचा मटार खायला द्यावं. योग्य प्रमाणात मटार खाल्ल्याने आरोग्यविषक कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.

हिरवे मटार खाण्याचे फायदे:

कोलेस्ट्रॉल: हिरव्या मटारमध्ये विरघळणारे फायबर असतात. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. जर तुम्हाला शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवायचं असेल तर हिरवे मटार फायदेशीर आहेत.

लठ्ठपणा: हिरव्या मटारमधील फायबर आणि प्रथिने वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. हिवाळ्यात आहारात हिरव्या मटारचा समावेश केल्यानं वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

रोगप्रतिकारशक्ती: निरोगी शरीर राखण्यासाठी हिरवे मटार खाणं चांगलं. हिरव्या मटारमध्ये अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहिल्यास शरीराचे विविध संसर्गांपासून संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा