ETV Bharat / health-and-lifestyle
आठवड्यातून किती चिकन खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास होतात हे परिणाम
चिकन खाणं आपल्यापैकी अनेकांना आवडते. अनेक जण रविवारी न चुकता चिकन खातात. परंतु जास्त चिकन खाल्ल्याने आरोग्याविषयक समस्या उद्भवू शकतात. वाचा सविस्तर..,

Published : February 17, 2026 at 4:01 PM IST
how much chicken eat in a week: जगभरातील बरेच लोक प्रथिनांसाठी चिकनला खाण्यास प्राधान्य देतात. चिकनमध्ये प्रथिनांसोबतच अमीनो आम्ल भरपूर प्रमाणात आढळतात. जे विविध शारीरिका कार्यांसाठी महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त चिनमध्ये व्हिटॅमिन बी सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. जे एकूण आरोग्यास आधार देतात. म्हणून जिममध्ये जाणारे बरेच लोक प्रथिनांसाठी चिकन खातात. परंतु आपल्यापैकी अनेक लोक विचार न करता चिकन खातात. चिकन खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे काय? मात्र, आठवड्यातून किती चिकन खाणं आरोग्याच्या दृष्टीनं चांगंल? हे तुम्हाला माहिती आहे काय?
अभ्यास काय म्हणतो: न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार , जास्त चिकन खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. जे लोक आठवड्यातून 300 ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खातात त्यांना पोट आणि आतड्यांसंबंधी आजारांचा धोका वाढतो. संशोधकांचं म्हणणं आहे की, जास्त चिकन खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आतड्यांसंबंधी कर्करोगाचा धोका वाढतो. या संशोधनात असं आढळून आलं की, महिलांपेक्षा पुरुषांना याचा जास्त धोका असतो. यासाठी इटलीतील 4869 लोकांवर 19 वर्षे संशोधन करण्यात आले. त्यात असं आढळून आलं की, जास्त चिकन खाणाऱ्या लोकांना आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
संशोधनात उघड झालेले तपशील:
- संशोधनातून असं दिसून आलं आहे की, जे लोक आठवड्यातून ३०० ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खातात त्यांना आठवड्यातून 100 ग्रॅमपेक्षा कमी चिकन खाणाऱ्यांपेक्षा मृत्यूचा धोका 27 टक्के जास्त असतो.
- पुरुषांमध्ये हा धोका 61टक्क्यांपर्यंत वाढला. याचा अर्थ असा की 100 ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खाणाऱ्या पुरुषांमध्ये अकाली मृत्यूची शक्यता जवळजवळ दीड पट जास्त असते.
- जे लोक आठवड्यातून 100-200 ग्रॅम चिकन खातात त्यांना पचनसंस्थेच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका 65 टक्के जास्त असतो.
- ज्या लोकांनी 300 ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खाल्ले त्यांचा पचनसंस्थेच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका 127 टक्के जास्त होता. पुरुषांमध्ये हा धोका 161 टक्के जास्त होता.
तुम्ही प्रत्यक्षात किती चिकन खावे?
हेल्थलाइननुसार 2020-2025 साठीच्या अमेरिकन आहार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये २००० कॅलरीजच्या आहारात दर आठवड्याला 740 ग्रॅम प्रथिने, दुबळे मांस, चिकन आणि अंडी यांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. चिकनसाठी कोणतीही विशिष्ट मर्यादा नाही. परंतु, असं म्हटलं जातं की, चिकन हे लाल मांसापेक्षा चांगले आहे. संशोधनात असं म्हटलं आहे की, दर आठवड्याला 300 ग्रॅमपेक्षा कमी चिकन खाणं चांगलं. तसंच 100 ग्रॅमपेक्षा कमी खाणे अजूनही सुरक्षित आहे. निरोगी व्यक्तीने दररोज 50 ग्रॅमपेक्षा जास्त खाऊ नये. आठवड्यातून 300 ग्रॅमपेक्षा कमी खाणे सुरक्षित आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रथिनांचे असंतुलन होऊ शकते. यामुळे आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.
अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की, जास्त चिकन खाल्ल्याने पचनसंस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो आणि काही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. म्हणूनच 300 ग्रॅमपेक्षा कमी चिकन खाणे हा एक चांगला पर्याय आहे. याव्यतिरिक्त, संतुलित आहार हा एक चांगला पर्याय आहे. यासोबतच डाळी, बीन्स, सोया उत्पादने, फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये चांगली पोषक तत्वे प्रदान करतात. तळलेले चिकन आणि मसालेदार चिकन खाल्ल्याने या समस्या वाढतात. तज्ञांचं म्हणणं आहे की, इंजेक्शन दिलेल्या कोंबडीच्या मांसामुळे हा धोका आणखी वाढतो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

